No facilities in cremetorium in Tekadi Nagpur  
नागपूर

स्मशानभूमीतील गैरसोयीने टेकाडी ग्रामस्थ त्रस्त ; अंधारात करावे लागतात अंत्यसंस्कार; प्रशासनाचं दुर्लक्ष 

सकाळ डिजिटल टीम

टेकाडी (जि. नागपूर) : ग्रामीण भागात वाढत कोरोनाचा उद्रेक बघता शहरांसह ग्रामीण भागात बाधित रुग्णासोबत मृतांची संख्या देखील वाढू लागलेली आहे. कोरोना बाधित मृत्यू असो अथवा इतर कुठल्या आजाराने झालेला मृत्यू असो ग्रामस्थ कुठलाही मृतदेह जास्त काळ न ठेवता तात्काळ त्याच्या अंत्यविधी संसर्गाचा भीती पोटी करावा लागत आहे. मात्र समशान घाटावरच गैरसोय असेल तर स्थानीय ग्रामपंचायत प्रशासन आणि पुढारी करतात काय हा सवाल स्थानिकांनी व्यक्त करायला सुरुवात केलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गावात मृतांची संख्या वाढतीवर आहे.ज्यात कोरोना बाधित किंवा इतर आजाराने झालेल्या मृतांचा देखील समावेश आहे,कोरोना बाधितांचा मृतदेहाचा अंत्यविधी केल्यानंतर दुसऱ्या एखाद्या मृतदेहाचा अंतसंस्कार करताना ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडत असते.

सध्या गावात मृत्यू झाल्यास कोरोना संसर्गाच्या भीती पोटी कुणीही अधिक वेळ न लावता तात्काळ मृतदेहावर अंत्यविधी करतात मग रात्री उशिरा का होईना.  मात्र समशान भूमीत विजेची आणि पाण्याची सोय नसल्याने ग्रामस्थाना अनेक समस्येला सामोरे जावे लागते. गावातील युवकांनी अनेकदा ग्राम पंचायत प्रशासनाला सदर समस्येबाबद अवगत केले असले तरी कुणीही सदरच्या समस्येकडे लक्ष देत नसून समशान भूमीतून साहित्य चोरी जाईल असे कारण पुढे करून वेळ मारून नेतात.

अंतीमविधीकरता लागणारे पाणी स्थानिकांना सोबत आणावे लागते.काही `वर्षांआधी एकदा नळजोडणी करण्यात आली मात्र ती फुटल्यानंतर परत प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नसल्याने नेमके प्रशासनाचे लक्ष कुठे आहे असा संतप्त सवाल स्थानिकांनी विचारायला सुरवात केलेली आहे.अश्यात वाढता कोरोनचा उद्रेक बघता समशान भूमीत हातपंप आणि हायमास्ट लाईट लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 3rd ODI: २-० ने मालिका जिंकली अन् आता टीम इंडियात होणार मोठा फेरबदल? तिसऱ्या वनडेत ‘या’ स्टार्सची एन्ट्री, कोण होणार OUT?

Pune News : पुण्यात २२ तासांत १२३ मुलींचे अपहरण झाल्याचा दावा खोटा; सोशल मीडियावरील ती ‘रील’ निराधार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

Latest Marathi News Live Update : बॉलीवूड अभिनेता डिनो मोरियाची 6 तास 45 मिनिटं चौकशी

Custard Apple Season : धारूरचा हंगाम संकटात! दुष्काळाने सीताफळाचा गोडवा हिरावला; मजुरांच्या रोजगारावर होणार परिणाम

Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ मंदिर भाविकांसाठी महिनाभर बंद; नित्यपूजा मात्र सुरू राहणार

SCROLL FOR NEXT