school Sakal
नागपूर

शाळा सुरू करण्याची अद्याप घाई नाहीच !

ओमिक्रॉनची धास्ती ; निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनचे संकट बघता शहरातील शाळांमध्ये पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय १५ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलला. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील आदेश १५ डिसेंबरनंतर काढण्यात येतील, असे स्पष्ट केले. आठवी ते बारावीपर्यंत वर्ग यापूर्वीच सुरू करण्यात आले आहे.

राज्य सरकारने पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, ओमिक्रॉनचे संकट बघता आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी १० डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. आज त्यांनी पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला. शहरात दररोज वाढणारे कोरोनाबाधित तसेच ओमिक्रॉनचे संकट आहे. शहरातील शाळांबाबत निर्णय घेण्याचे अधिकारी राज्य सरकारने आयुक्तांना दिले आहे.

आयुक्तांनी शहरातील शाळांबाबतचे आदेश १५ डिसेंबरला आढावा घेतल्यानंतर काढण्यात येणार आहे. पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन होणार आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमिवर आयुक्तांना नागरिकांना कोविड नियमांचे पालन करणे, घराबाहेर पडताना मास्क, सतत सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर राखून व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shendurwada News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रयत्न; दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार प्रशांत बंब यांचे आश्वासन

Karad News : साताऱ्यातील तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्यासाठी शंभूराज देसाई यांची थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

Ganeshotsav Dhol Tasha : गणेशोत्सवात मुळशीकर ढोल पथकांची कोट्यावधी रुपयांची कमाई; मुंबई, पुण्यात घुमला आवाज

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

SCROLL FOR NEXT