corona e sakal
नागपूर

कंटेन्मेंट झोनमध्ये ना सुरक्षा रक्षक ना फलक, कोरोना रुग्णांबाबत समजणार कसे?

सकाळ वृत्तेसवा

नागपूर : कोरोनारुग्ण जास्त असलेल्या भागाला कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करून टीन टाकण्यात आले. परंतु, येथे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत. शिवाय कोरोनारुग्ण असल्याबाबतचे बऱ्याच ठिकाणी फलकही लावण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोनाला आळा बसणार कसा, असाच प्रश्न निर्माण होत आहे.

राज्य सरकारने कोरोनाची चेन तोडण्यासाठी निर्बंध अधिक कडक केलेत. त्यासाठी कंटोन्मेंट झोन तयार करण्याच्या सूचना दिल्या. महानगरपालिकेकडून जास्त रुग्णसंख्या असलेल्या भागात कंटोन्मेंट झोन तयार करण्यात येत आहे. दोन्ही बाजूला टिन टाकून रस्ता बंद करण्यात येत असून काही भाग खुला ठेवण्यात येते. परंतु येथे सुरक्षा रक्षकाची नियुक्तीच केलेली नाही. परिणामी कंटोन्मेंट भागातील नागरिक बिनधास्त फिरत आहे. घरीच विलगीकरणात असलेल्यांच्या घराबाहेर कोरोनारुग्णाबाबतचे पोस्टरही लावण्यात येत नाही. त्यामुळे त्यांच्याकडेही अनेक जण ये-जा करीत असल्याचे सांगण्यात येते. शहरातील अनेक भागात रुग्ण असल्याने तेथे कंटोन्मेट झोन तयार करण्यात आले. परंतु सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नसल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Pune Metro: पुणेकरांना मोठा दिलासा! विमानतळाला मेट्रोची थेट जोडणी, कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल; मोहोळ यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT