no single reservation for obc in ramtek panchayat samiti in nagpur 
नागपूर

ओबीसीला एकही जागा आरक्षित नाही, रामटेक पंचायत समितीत आरक्षणाचा क्रमही बदलणार

नीलेश डोये

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील ओबीसींच्या जागा कमी होणार असून आदिवासी बहुल भागातही एकही जागा आरक्षित राहणार नसल्याचे चिन्ह आहेत. जिल्ह्यातील रामटेक पंचायत समितीमध्ये तर ओबीसीसाठी एकही जागा राहणार नाही. 

जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण ५० टक्के पेक्षा जास्त झाल्याने पाच जिल्हा परिषदांमधील ओबीसींच्या सर्व जागांवर निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नव्याने प्रक्रिया करण्यात करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती, जमाती यांचे आरक्षण काढल्यानंतर ओबीसींसाठी (नामाप्र) जागांचे आरक्षण काढण्यात येते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आरक्षण काढण्याचा क्रमही बदलणार आहे. त्यामुळे अनेक जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींचे संख्याबळ घटणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आदिवासी बहुल क्षेत्रात हे चित्र प्रखरतेने दिसून येईल. नागपूरच्‍या रामटेक पंचायत समितीमध्ये १० जागा आहेत. सध्या १ जागा अनुसूचित जाती, ४ जागा अनुसूचित जमाती, ३ जागा ओबीसी तर २ जागा सर्वसाधारण गट (खुला प्रवर्ग) करिता आहे. सर्वोच्‍च न्यायालयाचा निकष लावल्यावर किमान ५ जागा सर्वसाधारण गटासाठी ठेवाव्या लागणार आहेत. त्यामुळे ओबीसीसाठी एकही जागा राहणार नाही. 

रामटेक पंचायत समिती -
सध्यस्थिती 
एस.सी. १ 
एस.टी. ४ 
ओबीसी ३ 
खुला प्रवर्ग २ 

न्यायालयाच्या निर्णयानुसार -
खुला प्रवर्ग ५ 
एस.सी. १ 
एस.टी. ४ 

आरक्षण काढण्याचा क्रमही बदलणार! 
सध्याच्या आरक्षण क्रमानुसार अनुसूचित जाती त्यानंतर अनुसूचित जमाती, ओबीसी व खुल्या प्रवर्गाकरता जागा निश्चित केल्या जातात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्के जागा आरक्षित ठेवायच्या आहेत. त्यामुळे ५० टक्के जागा आधी आरक्षित ठेवाव्या लागणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती व उर्वरित जागा ओबीसीसाठी राहतील. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Ethanol News : ई-२० नंतर आता शंभर टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या वाहनांवर भर; नितीन गडकरींची मोठी घोषणा

कीर्तनातून प्रसिद्ध झालेल्या तरुणीची भन्नाट गोष्ट; ‘पाच फुटाचा बच्चन’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता

IND vs WI 2nd ODI : वेस्ट इंडिजने इतिहास घडवला! सर्वोच्च धावसंख्या, भारताविरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड; कॅम्बेल, होप अन् जांगूचे शतक, ४०० पार

Latest Marathi News Live Update : कर्नाटकातील 'मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड'मध्ये अचानक भीषण आग

कसाबच्या भूमिकेत ललित प्रभाकरला पाहून येईल चीड; राजकुमार रावही जबरदस्त, 'प्रहार' चा ट्रेलर बनला चर्चेचा विषय

SCROLL FOR NEXT