court-hammer. 
नागपूर

अखेर इंग्रजकालीन परंपरा मोडली, यंदा न्यायालयाला उन्हाळी सुट्या नाहीत

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दरवर्षी उन्हाळ्यात कोर्टाला सुट्या असतात. यंदा मात्र लाँकडाऊनमुळे कोर्टाचे कामकाज मार्चमध्येच बंद करावे लागले. ते कामकाज भरून काढण्यासाठी यंदा उन्हाळी सुट्या रद्द करण्यात येणार अाहेत.
 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयीन कामकाजावर निर्बंध आणले. या संकटकाळी न्यायालयाचे कामकाज कमी झाले आहे. त्यामुळे, न्यायालयांची उन्हाळी सुटी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालय प्रशासनाने घेतला.

पूर्वीच्या नियोजनानुसार न्यायालयाला ७ मे ते ७ जूनपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, ३ मे नंतर लॉकडाउन मागे घेण्यात आला; तर, मुंबई उच्च न्यायालयासह नागपूर व औरंगाबाद खंडपीठांमध्ये आणि राज्यभरातील सर्व न्यायालयांत नियमित कामकाज होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय, उच्च न्यायालयाच्या कामकाजात अर्ध्या तासाने वाढ करण्यात येईल. त्यानुसार, दररोज सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता न्यायालयीन कामकाज सुरू होईल, असे उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल एस. बी. अग्रवाल यांनी स्पष्ट केले.  त्यानुसार, लॉकडाउन मागे घेण्यात आले तर दररोज सकाळी १०.३० पासून उच्च न्यायालयांचे न्यायालयीन कामकाज होईल.

लॉकडाउन कायम राहिल्यास सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे उच्च न्यायालयांचे कामकाज चालेल’, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. सध्याच्या लॉकडाउनच्या काळात आठवड्यातून दोन दिवस केवळ दोन तासांसाठी  तातडीच्या व अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घेण्यात येत आहे. उच्च न्यायालयाप्रमाणेच राज्यभरातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये पुढील महिन्यात ज्या कालावधीत उन्हाळी सुटी असते ती यंदा नसेल आणि लॉकडाउन मागे घेण्यात आल्यानंतर त्या कालावधीत न्यायालयांचे नियमित कामकाज होईल, असेही उच्च न्यायालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं उच्चांकापासून 26 हजारांनी स्वस्त! पाहा ताजा भाव; पुढे सणासुदीच्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?

MPSC Exam Success Story : शेतकरी बापाची लेक अन् आई पोलिसात! जाधववाडीच्या निकिताची MPSC मध्ये गगनभरारी, महसूल सहाय्यकपदी निवड

Caste Validity Certificate : जातवैधता प्रमाणपत्राचा आग्रह न धरता तात्पुरता प्रवेश द्या; उच्च न्यायालयाकडून अंतरिम दिलासा

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Rajendra Yadravkar : गोकुळ प्रचारावेळी यड्रावकरांच्या ताफ्याला सैनिक टाकळीत काळे झेंडे; प्रस्तावित एमआयडीसीविरोधात संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT