No water supply in rural schools school and student news 
नागपूर

धक्कादायक! ग्रामीण भागातील ५६७ शाळांमध्ये नाही पाण्याची सोय; बॉटल किंवा पर्यायी साधनांचा वापर

नीलेश डोये

नागपूर : जिल्हा परिषदेसह खासगीच्या ५६७ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणीच मिळत नसल्याची धक्कादायक माहिती जलजीवन मिशनच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना बॉटल किंवा पर्यायी साधनांमध्ये घरूनच पाणी आणावे लागत आहे.

आदिवासीबहुल रामटेक तालुक्यातील ८३ शाळांत पाणीपुरवठ्याची कुठलेही साधन नाही. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांची काही वर्षांपासून फरपट चालली आहे. जिल्ह्यात केंद्र शासनाच्या जलजीवन मिशनचे काम युद्धस्तरावर सुरू आहे.

प्रत्येक घरी नळ या योजनेचा कृती आराखडा तयार करून पिण्याच्या पाण्याची सोय नसलेल्या शाळांमध्ये नळजोडण्या देण्याचा हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. या अहवालातून प्राथमिक, माध्यमिक शाळांतील ही वस्तुस्थिती समोर आली आहे. लवकरच ही समस्या पूर्णत्वास जाईल, असा आशावाद शिक्षण विभागाला आहे. 

जिल्ह्यात जिल्हा परिषद, खासगी माध्यमिकच्या २ हजार ४६७ शाळा आहेत. यात जिल्हा परिषदेच्या १५२९ शाळांचा समावेश आहे. पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेतात़ जलजीवन मिशनच्या सर्वेक्षणाअंती, १९०० शाळांमध्येच या नळजोडण्या लावून पिण्याचे पाणी विद्यार्थ्यांना मिळते आहे. 

उर्वरित ५६७ शाळांमध्ये पाण्याची कुठलीही व्यवस्था नाही. रामटेक तालुक्यापाठोपाठ कुही, नागपूर ग्रामीण, मौदा, हिंगणा तालुक्यात ही स्थिती अधिक प्रभावित करते आहे. या प्रकारामुळे साधारणत: २५ हजारांवर विद्यार्थ्यांना वर्गात शिकवणीचे पाठ गिरविताना घसा कोरडा ठेवावा लागतो. खासगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या अधिक आहे. हा आकडा ३१६ शाळा इतका आहे. 

तालुका शाळासंख्या 

नागपूर ग्रामीण ६७ 
हिंगणा ६१ 
कामठी १७ 
काटोल २२ 
नरखेड १६ 
सावनेर ३० 
कळमेश्वर १६
रामटेक ८३ 
मौदा ६३ 
पारशिवनी ४५ 
उमरेड ३७ 
कुही ७४ 
भिवापूर ३६


संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

दोन वर्षातून १ चित्रपट तरीही कोट्यवधींचा मालक आहे सलमान खान; कुठून होते अभिनेत्याची कमाई, वाचा साइड बिझनेसचं गणित

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Latest Marathi News Live Update : ३०० लोक रद्द, पश्चिम रेल्वेवर सहाव्या मार्गिकेसाठी शनिवारी कामे

SCROLL FOR NEXT