file photo 
नागपूर

नागपुरातील बॅडमिंटनपटूंसाठी कोणती आहे आनंदाची बातमी, वाचा

नरेंद्र चोरे


नागपूर  : मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात लवकरच अनिवासी बॅडमिंटन अकादमी सुरू करण्यात येणार आहे. क्रीडा व युवक कल्याण संचालनालयाकडून अकादमीला नुकतीच मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अकादमी सुरू होणार असल्याची माहिती आहे. 


विभागीय क्रीडासंकुलातील क्रीडा प्रबोधिनीत सुरू होणाऱ्या या अकादमीविषयीची औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर इनडोअर सभागृहातील सिंथेटिक कोर्टवर अकादमीला औपचारिक सुरूवात होईल. यासंदर्भात जिल्हा क्रीडाधिकारी अविनाश पुंड म्हणाले, नागपुरात बॅडमिंटनचा चांगला माहोल असल्यामुळे येथे अकादमी व्हावी, अशी अनेक दिवसांपासून मागणी होती. सुदैवाने शासनाकडून अकादमीला नुकताच हिरवा कंदिल दाखविण्यात आला. राज्याचे प्रशिक्षक कलिमुद्‌दीन यांच्या नेतृत्वाखालील होणाऱ्या या अकादमीसाठी अलीकडेच 14 बॅडमिंटनपटूंची निवड करण्यात आली आहे. प्रशिक्षकांची नियुक्‍ती राज्य सरकारच्या क्रीडापीठाकडून होणार आहे. याशिवाय दरमहा 25 हजारांच्या मानधनावर स्थानिक एनआयएस प्रशिक्षकाची नियुक्‍ती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य असलेले पुंड अकादमीबद्‌दल सविस्तर बोलताना म्हणाले, निवड झालेल्या खेळाडूंना सकाळी व सायंकाळी दोन सत्रांत नि:शुल्क प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रबोधिनीकडून त्यांना नाश्‍ता व दुपारचे जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे. याशिवाय अकादमीकडून स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना प्रवास व महागाई भत्ताही मिळणार आहे. अकादमीसाठी निवड झालेल्या काही खेळाडूंच्या पालकांनी पुंड यांची भेट घेऊन अकादमी लवकरात लवकर सुरू करण्याची विनंती केल्याची माहिती आहे. 


संपादन : मेघराज मेश्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT