Notorious prisoner escapes from medical 
नागपूर

कैद्यावर लक्ष ठेऊन असलेल्या पोलिसांचा मध्यरात्री लागला डोळा अन्‌ दोन तासांनी उघडकीस आली ही घटना...

अनिल कांबळे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (मेडिकल) टीबी वॉर्डात उपचारासाठी दाखल केलेला कुख्यात कैदी शुक्रवारी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. फरार कैद्याला शोधण्यासाठी इमामवाडा पोलिस ठाण्यामधील दोन पथके आणि क्राइम ब्रॅंचचे दोन पथके तैनात केल्याची माहिती आहे. नाडार असे फरार झालेल्या कैद्याचे नाव आहे. यापूर्वीसुद्धा तो रुग्णालयात उपचार घेताना पळून गेल्याची माहिती आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती कारागृहात मूळचा केरळ येथील रहिवासी असलेला नाडार नावाचा कुख्यात कैदी गेल्या काही वर्षांपासून शिक्षा भोगत होता. त्याला टीबीचा आजार जडला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी मेडिकलमधील टीबी वॉर्डात त्याला उपचारासाठी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेसह भरती केले होते.

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तो वॉर्डात आराम करीत असताना सुरक्षारक्षकांचा डोळा लागला. अंधाराचा फायदा घेत कैद्याने टीबी वॉर्डातून पळ काढला. त्याने पळ काढल्यानंतर जवळपास दोन तासांनी ही घटना उघडकीस आली. सुरक्षारक्षकांनी लगेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना आणि जेल प्रशासनाला माहिती दिली. इमामवाडा पोलिस ठाण्यात तूर्तास याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांचे चार पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

यापूर्वी ही काढला होता पळ

कुख्यात कैदी नाडार याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तो मूळचा केरळ राज्यातील आहे. यापूर्वीसुद्धा त्याने उपचार घेत असताना रुग्णालयातून पळ काढला होता. तेव्हा क्राइम ब्रांच मे नाडारला केरळ राज्यातील त्याच्या शेतातून अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढे इफेक्ट? FDA ने चारपट वाढवली अन्न तपासणी, धक्कादायक आकडे समोर

Sahyadri Express: खिडकीतून हात घालून पर्स लंपास; प्लॅटफॉर्मवर महिलेचे दागिने हिसकावले, सह्याद्री एक्सप्रेसमध्ये चोरट्यांचा थरार

Latest Marathi Live Update: पुण्यात वाघोली परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

SCROLL FOR NEXT