Now agitation in front of the Energy Ministers house
Now agitation in front of the Energy Ministers house 
नागपूर

आता ऊर्जामंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या मांडणार; वीज माफीसाठी आंदोलन 

राजेश चरपे

नागपूर : कोरोना काळातील वीज बिल माफ करावे यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी व्हेरायटी चौकातील गांधीपुतळ्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुढच्या टप्प्यात चार जानेवारीला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालण्यात येणार आहे.

कोरोना काळातील वीज बिल सरकारने भरावे, दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावे आदी घोषणा आंदोलनदरम्यान देण्यात आल्या. तसेच वेगळ्या विदर्भासाठी नारे लावण्यात आले. राम नेवले यांच्या नेतृत्वात आंदोलकांनी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले.

रोजगार व उद्योग धंदे बंद असतानाही वीज बिलाची आकारणी करून सरकार जनतेवर अन्याय करीत आहे, बिलामध्ये २१ टक्के वाढ करून ते तीन महिन्यांचे एकत्रित बिल घेऊन सरकारने लूटमार केली असा आरोप यावेळी नेवले यांनी केला.

वीज तोडली तर विदर्भ राज्य आंदोलन समिती तोडलेले कनेक्शन जोडून देण्याचे आंदोलन करणार आहे. आता विजेच्या व विदर्भाच्या प्रश्‍नावर महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारशी मोठा संघर्ष होणार आहे. चार जानेवारीला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराला घेराव घालून त्यांच्या घरावर विदर्भातील जनता डेरा टाकणार असल्याचे नेवले यांनी जाहीर केले.

आंदोलनात युवा आघाडी नागपूर विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर, महिला आघाडी अध्यक्षा नागपूर शहर रेखा निमजे, विष्णू आष्टीकर, सुयोग निलदावार, ज्योती खांडेकर, सुनिता येरणे, गुलाबराव धांडे, नरेश निमजे, नितीन अवस्थी, राजेंद्र सतई, तुषार ब्राम्हणकर, रवींद्र भामोडे, विना भोयर, प्रशांत जयकुमार, अनंतराव भुरे, प्यारूभाई, प्रफुल बोबडे, आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT