Now dal is availble on low price 
नागपूर

खुशखबर ! गरिबांची डाळ आता शिजणार, डाळींच्या भावात घट

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :  कमी झालेली मागणी, वाढलेले उत्पादन, पुरेशी आवक यामुळे नागपूरच्या बाजारात तूरडाळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, मुग डाळीच्या दरात प्रति किलो पाच ते दहा रुपयाची घसरण झाली आहे. टाळेबंदीमुळे कामगार घराच्या दिशेने परतू लागले आहेत. त्याचाही परिणाम मागणीवर झाल्याने किंमती कमी झाल्या आहेत. त्यात पुन्हा डाळीच्या दरात चढ उतार सुरू राहतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

धान्याच्या घाऊक बाजारात डाळीची आवक सुरू झाली आहे. सध्या ग्राहकांची मागणीही अधिक नाही. व्यापाऱ्यांकडे डाळींची उपलब्धता अधिक आहे. मात्र, ग्राहकांकडे पैशाची टंचाई असल्याने डाळीची जावक होत नाही. उलाढाल थंडावल्याने डाळीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तूरडाळीच्या दरात प्रति किलो पाच ते दहा रुपयांची घट झाली आहे. उडीद डाळीच्या दरात सर्वाधिक प्रति किलो पाच ते सात रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती डाळीचे व्यापारी प्रताप मोटवानी यांनी सांगितले. हरभऱ्याला प्रति क्विंटल चार हजार 875 रुपये हमी दर आहे. राज्यात रब्बी हंगामात यंदा 22.89 लाख हेक्‍टरवर हरभरा पेरणी करण्यात आलेली आहे. खरेदी केलेल्या डाळीची लोडिंग करण्यासाठीही कामगार मिळत नाही. टाळेबंदीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट बंद झाल्याने डाळीची मागणी कमी झालेली आहे. त्यामुळे नागपूर शहरात हरभरा डाळीचे भाव 5150-6000 रुपये प्रति क्विंटलवर पोहचले आहेत. नवी मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात काम करणाऱ्यांनाही कोरोनाचा फटका बसू लागला आहे. त्यामुळेही डाळीच्या खरेदीवरही परिणाम झालेला आहे.
आंब्याचे भाव कमी झाल्यामुळे तूर डाळीची मागणी कमी झालेली आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वी 90 ते 95 रुपये किलो असलेली तूरडाळ आता 84 ते 85 रुपयांपर्यंत घसरली आहे.
नवीन मसूर व मुगाचे उत्पादन वाढल्याने दरात घसरण झालेली आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड या राज्यातील शेतकऱ्यांनी मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात केली. विक्रमी उत्पादन झाले आहे. मागणी कमी आणि आवक वाढली आहे. त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पापडासह इतर वाळवणासाठी मसूर आणि मुगाची मागणी कमी झालेली आहे. मसुर डाळीत प्रति किलो मागे पाच ते सहा रुपयाची तर मुग डाळीच्या दरात प्रति किलो पाच रुपयाची घसरण झालेली आहे. राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्यप्रदेशातून उडीद डाळीची तर मसूर डाळ अर्जेटिंना, ऑस्ट्रेलियामधून आयात करण्यात येते. उडीद डाळीच्या दरातही घट झालेली आहे.

डाळीचे दर - मंगळवारची किंमत - जूने दर

  • तूर डाळ - 84-85 ः 90- 95
  • हरभरा डाळ - 50-53 ः- 56-57
  • मसूर डाळ - 67-68 -ः 72-74
  • मुग डाळ - 112-115 ः 120 - 122

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT