ncc  
नागपूर

NCC आता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात; विद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : नॅशनल कॅडेट कोर (एनसीसी)मध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘एनसीसी‘चा विद्यापीठात ‘जनरल इलेक्टिव क्रेडिट' अभ्यासक्रम स्वरुपात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह देशभरातील सर्वच विद्यापीठात समावेश करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नॅशनल कॅडेट कोर (एनसीसी) माध्यमातून विद्यार्थी सैन्यदलात जाण्यासाठी तयार करण्यात येतात. यासाठी त्यांना ‘बी‘ आणि ‘सी‘ प्रमाणपत्र देण्यात येते. महाविद्यालयस्तरावर अनेक विद्यार्थी त्यात सहभागी होताना दिसून येतात. मात्र, याचा शैक्षणिक स्तरावर पाहिजे त्या प्रमाणात फायदा होताना दिसून येत नाही. त्यामुळे आता त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फायदा देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याचा समावेश विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्याचे निर्देश दिले आहे.

विशेष म्हणजे, विद्यापीठात एनसीसीमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातूनच विद्यापीठाद्वारे यासंदर्भात विविध योजनांचा समावेश करण्यात येत आहे. त्यातूनच विद्यापीठाने २०२० च्या परीक्षेत एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सवलत दिली होती. विद्यार्थ्यांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने त्याचा समावेश अभ्यासक्रमात करण्यासाठी विद्यापीठाद्वारे अभ्यासमंडळ आणि विद्वत परिषदेत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

२०१५ साली केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एका कार्यक्रमात एनसीसीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याला अभ्यासक्रमात समाविष्ठ करता करता पाच वर्षाचा कालावधी निघून गेला.

असे असतील क्रेडिट

एनसीसीमार्फत स्वतः अभ्यासक्रम तयार करुन दिला आहे. हा अभ्यासक्रम सर्व विद्यापीठात सारखा राहणार आहे. त्यानुसार सहा सेमिस्टर करणाऱ्या विद्यार्थ्याला २४ क्रेडिट देण्यात येणार आहे. त्यापैकी ८ लेखी, ६ प्रात्यक्षिक आणि १० क्रेडिट कॅम्पवर देण्यात येणार आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT