scholarship  
नागपूर

विद्यार्थ्यांना मिळणार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती; ओबीसी विद्यार्थ्यांना दिलासा; राज्य सरकारकडून निधी

अथर्व महांकाळ

नागपूर : मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारने निधी दिला होता. मात्र, राज्य सरकारने निधीच दिला नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली. मात्र, आता राज्य सरकारने १० कोटी ३० लाख रुपयाचा निधी दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. याबाबत दै. सकाळने वृत्त प्रकाशित केले होते.

राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली. अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दीड हजार तर भटक्या व विमुक्त जातींमधील विद्यार्थ्यांना हजार रुपये शिष्यवृत्ती देण्याचे ठरले. यासाठी २१ कोटी ३८ लाखाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच केंद्राकडून १० कोटी ३० लाखाचा निधी राज्य सरकारकडे देण्यात आला.

त्यात राज्य सरकारने आपला १० कोटी ३० लाखाचा वाटा देणे अपेक्षित होते. मात्र, राज्याने निधीच दिला नाही. त्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, राज्याच्या ओबीसी मंत्रालयाने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठविला. मात्र, या प्रस्तावाबाबत वित्त मंत्रालयाने कुठलाच निर्णय घेतला नसल्याचे दिसून आले.

गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही. याबाबत सकाळने वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत, राज्य सरकारने आपला वाटा दिला आहे. याबाबत समाजकल्याण अधिकारी देशमुख यांना विचारणा केली असता, त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची अट नकोच

यापूर्वी प्रवेशासाठी केवळ उत्पन्नाचा दाखला देण्यात येत असताना, आता विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला मागण्याची गरज नाही. त्यामुळे ही अट तत्काळ रद्द करावी. याशिवाय सरसकट जात प्रमाणपत्राची अट रद्द करून शेतकरी कुटुंबातील व रोजंदारीवर जाणाऱ्या गरीब पालकांना दिलासा देण्याची मागणी स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया(SRAI- स्राई)चे अध्यक्ष उमेश कोराम यांनी केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT