corona  
नागपूर

मोठी बातमी! आता विदर्भातच तयार होणार रेमडेसिव्हिर; गंभीर रुग्णांवर वेळेत होणार उपचार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : संपूर्ण राज्यात सध्या कोरोनानं हाहाकार माजवला आहे. अनेकांना यामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र रेमडेसिव्हिर इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या इंजेक्शनचा निर्माण झाला आहे. पण आता एक दिलासादायक माहिती समोर येतेय. आता रेमडेसिव्हिरचं उत्पादन विदर्भातच होणार आहे.

नागपूर आणि विदर्भात असलेली रेमडेसिव्हिर इंजेक्शनची कमतरता लक्षात घेता वर्ध्याच्या 'जेनेटेक लाईफ सायन्सेस'ला ३० हजार वायल प्रतिदिन रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याबद्दल सातत्यानं पाठपुरावा करत होते.

रेमडेसिव्हिर तयार करणाऱ्या गिलेड कंपनीने सात कंपन्यांना हे इंजेक्शन तयार करण्याची परवानगी दिली होती. त्यातील एक कंपनी 'लोन लायलंस'द्वारा जेनेटिक लाईफ सायन्स रेमडेसिव्हिर इंजेक्शन तयार करेल. साधारण एका आठवड्यात वर्ध्यात रेमडेसिव्हिर उत्पादन सुरू होईल आणि पंधरा दिवसांत ३० हजार वायल प्रतिदिन इंजेक्शन्स विदर्भातील सगळ्या जिल्ह्यांत उपलब्ध होणार आहेत.

विदर्भातच रेमडेसिव्हिरचं उत्पादन सुरु होत असल्यामुळे आता कोरोना रुग्णांना आणि नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे. यामुळे रुग्णांचे जीव वाचण्यातही मदत होणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'या' नागरिकांना मोफत धान्य मिळणार, 'वन नेशन, वन रेशन कार्ड'द्वारे सुविधा; प्रशासनाचा मोठा निर्णय

राशीभविष्यानुसार दिसतात गोड, पण मनात असतं वेगळंच! ‘या’ ३ राशींच्या लोकांवर विश्वास ठेवताना जरा जपून राहा म्हणे; स्वभावाचं गुपित काय?

Maharashtra Live News : कल्याण कोर्टात वकिलांचे ठिय्या आंदोलन, कोर्टामधील काम ठप्प

Pimpri Chinchwad Water Supply: आंद्रा धरणातून पिंपरी चिंचवडला पाणी नको; प्रलंबित मागण्या पूर्ण करा, आंदर मावळातील गावकऱ्यांची भूमिका

Nanibai Chikhali Bandara Repair : निसर्गाचा आधार की प्रशासनाचे दुर्लक्ष? वेदगंगा नदीवरील ऐतिहासिक 'नानीबाई चिखली बंधारा' धोक्यात! कर्नाटककडे वाहून जातेय हजारो लिटर पाणी

SCROLL FOR NEXT