पारशिवनीः विविध रोगांमुळे सोयाबीन पिकाची झालेली अवस्था.  
नागपूर

आता डोके फोडून रक्त शिंपडावे काय, सोयाबीन उत्पादक व मजूर हतबल

रुपेश खंडारे

पारशिवनी (जि.नागपूर) : औंदा सोयाबीनचे पीक होणार, दोन पैसे हाती येणार, ही आशा असल्याने यावर्षीं तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीन पिकांचे क्षेत्रफळ१३०० हेक्टर होते. शिवारात सोयाबीनचे हिरवेगार पीक बहरू लागले. आता सोयाबीनचे पीक होईल, पण पावसाने नाकीनऊ आणले. नको तेव्हा पावसाने धोधो धुतले. उरलेले काम येलो, मोझॅक, खोडकीड आणि इतर किडीच्या प्रादुर्भावाने  केले. त्यात सोयाबीन पूर्णतः वाया गेले. खरिपाचे पहिले पीक सोयाबीन न कापता जनावरांना चाऱ्यासाठी शेतात सोडावे लागले. कारण सोयाबीन कापणीला परवडणारे राहीले नाही. मजुरांचा हंगाम पाहता पाहती खाली गेला. अशी व्यथा शेतकरी  व मजुरांच्या वाट्याला आली आहे.


 

२०० ते३०० रुपये मजुरी गेली
पारशिवनी भागात दरवर्षी मध्यप्रदेश, भंडारा, गोंदिया या भागातून मजूर या हंगामात सोयाबीन कापणीसाठी येत असतात. प्रतिएकर १६०० ते२००० रुपये मंजुरी मिळते.  यावर्षी सोयाबीन पीक नष्ट झाल्याने रोजगारावर गदा आली. एकतर सोयाबीनचा उत्पादन खर्च बुडाला. त्यात शेतकऱ्यांना वेदना त्या वेगळ्याच. मागील वर्षी सोयाबीन कापणीला २०० ते३०० रुपये मजुरी होती. आज मजुरांची मजुरीही गेली. शेतकऱ्यांना आशा होती की सोयाबीन होणार एकरी आठ-दहा पोती तरी घरी येईल. सोयाबीनच्या झाडांना भरभरून शेंगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. पण निसर्गाच्या असमतोलपणाचा झटका व रोगराई आल्याने सोयाबीन पीक हातून गेले. एक पोते सुद्धा सोयाबीन होईल की नाही, याचीही शाश्वती नाही. बियाण्यांची खरेदी, पेरणीचा खर्च, तणनाशक व अन्य औषध फवारणींसह कापणी तसेच काढणीच्या रकमेची गोळाबेरीज केली तर ‘ तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी परिस्थिती आली. इतर भागात काम नसल्याने रोजगारही मिळेनासा झाला आहे. तरी शासनाने या नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना आधार द्यावा, अशी मागणी पारशिवनी तालुक्यातील  शेतकऱ्यांमधून होत आहे.


 

उपासमारीची आली वेळ
उधारवाडी तसेच होते नव्हते जवळ असलेले पैसे खर्च करुन बीबियाणे खरेदी केले. सोयाबीन पेरले. पण निसर्गाचा प्रकोप, रोगराईने हाती येणारे पीक पूर्ण नष्ट केले. धानावर रोग आहे. कापसाचे काही खरे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.
सागर सायरे
शेतकरी

शेवटी निराशा झाली !
सोयाबन लावली ती शेतात बहरली.  सोयाबीन पिकेल हाती पैसा येईल ही आशा असताना पावसाने सोयाबीनला धुऊन काढले. ते होत नाही तर मोझॅक, खोडकिड आणि इतर किडीच्या प्रादुर्भावाने पीक संपूर्ण नष्ट झाले. त्यामुळे डोके फोडून रक्त शिंपण्याची वेळ आली आहे.
सुरेश भगत
शेतकरी, कंरभाड

 संपादनः विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Legislative Council election : पुणे विधानपरिषद निवडणुकीत मोठी घडामोड; सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

Monsoon Update News : आनंदवार्ता ! मॉन्सूनची केरळनंतर कर्नाटकात हजेरी, महाराष्ट्रात 'या' दिवशी दाखल होणार; हवामान विभागाचा नवा अंदाज समोर

कमळीच्या आनंदावर पडणार विरजण! आजोबांच्या मृत्यूचं सत्य अखेर समोर; प्रोमो पाहून प्रेक्षकही दुःखी

Pune Lonavala Railway: 'पुणे-लोणावळा रेल्वेमार्ग फुल्ल!' ८८% क्षमतेने धावणाऱ्या मार्गावर नव्या लोकल फेऱ्यांना ब्रेक, रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT