Now stop, now, these items have to be submitted to the black market, Upper Collector 
नागपूर

आता तरी थांबवा या वस्तुंचा काळाबाजार, अपर जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे लागले निवेदन

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरात कोरोनाबद्दलची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. सुरक्षेसाठी नागरिकांनी मास्क लावणे सुरू केले आहे. मात्र, अचानक मागणी वाढल्याने मास्क आणि सॅनिटायझर बाजारपेठेतून हद्दपार झाले आहेत. बाजारातील मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी मनसेचे जनहित कक्षाचे प्रदेश सरचिटणीस महेश जोशी यांनी केली. याबाबत त्यांनी अपर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांना निवेदन दिले.

गत दोन दिवसांत शहरात कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क लावण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. पालकवर्ग मास्कच्या शोधात भटकत आहेत. याचाच गैरफायदा घेत मास्कचा काळाबाजार सुरू आहे. कधीकाळी अवघ्या पाच ते पंधरा रुपयांना मिळणारे मास्क आज तब्बल चाळीस ते सत्तर रुपयांत नागरिक विकत घेत आहेत. प्रशासक कारवाई करीत असल्याचे सांगत आहेत. तरीही औषधविक्रेते आदेश धाब्यावर बसवून मास्कचा काळाबाजार करीत असल्याचे उघड आहे. मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्या औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करावे व अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी महेश जोशी यांनी केली.

याप्रसंगी मास्कच्या काळ्याबाजाराकडे लक्ष वेधून घेण्यासाठी जनहित कक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडावर रुमाल बांधून निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष इकबाल रिझवी, अध्यक्ष अरुण तिवारी, सचिव पराग सावजी, उपाध्यक्ष विकास साखरे, पंकज हटवार व पंकज तपासे, सूरज सोनवणे, शेख अब्रार व विनोद गयाल व पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT