Now you can do testing of corona near your home read full list of centers  
नागपूर

नागपूरकरांनो आता घराजवळच करा ‘कोव्हिड’ तपासणी; २१ ठिकाणी तपासणी केंद्र..वाचा झोननिहाय केंद्रांची माहिती... 

राजेश प्रायकर

नागपूर:  शहरात कोव्हिडमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. कोव्हिडचे उशिरा निदान होत असून अंतिम क्षणी उपचार घेण्यात येत असल्याने मृत्यूसंख्या वाढत आहे. आता नागरिकांनीच चाचणीसाठी पुढाकार घेऊन चाचणी केली तर उपचार करणे शक्य होईल.  

महापालिकेने शहरातील विविध भागात कोव्हिडसंदर्भातील सर्व सेवा सुरू केल्या आहेत. नागरिकांना आता घराजवळच कोव्हीड तपासणी करता येणार आहे. शहरात २१ ठिकाणी ‘कोव्हिड’ तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. याशिवाय येथे समुपदेशन व अन्य सेवाही उपलब्ध आहेत.

३८ कोव्हिड तपासणी केंद्र सुरू करणार

महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात एक असे एकूण ३८ कोव्हिड तपासणी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाला घराजवळ चाचणी करता यावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. तूर्तास २१ ठिकाणी असे सेवा केंद्र सुरू करण्यात आले. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा व पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या किंवा लक्षणे असल्यास कोव्हिड चाचणी करवून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. 

 अन्य आजारांच्याही होणार चाचण्या 

कोव्हिड, सारी सोबतच अन्य रक्त तपासणी करून निदान करण्यात येईल. यात पॉजिटिव्ह आढळलेल्या रुग्णाला आमदार निवास कोव्हिड केअर सेंटरमध्ये पाठविण्यात येईल. तेथे अन्य तपासण्या केल्यानंतर कुठल्या रुग्णालयात उपचार घ्यायचे की गृह विलगीकरणात ठेवायचे त्यादृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे चमू मार्गदर्शन करेल, अशी माहितीही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.

झोननिहाय कोव्हीड तपासणी केंद्र व वेळ

धरमपेठ 

  • सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग १४, लॉ कॉलेज होस्टेल, 
  • रविभवन प्रभाग १५, मॉरिस कॉलेज होस्टेल
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग १३, फुटाळा, हजारीपहाड व तेलंगखेडी प्रा. आरोग्य केंद्र 

मंगळवारी 

  • सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग १०, राजनगर
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ९, इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ११, झिंगाबाई टाकळी आरोग्य केंद्र

लक्ष्मीनगर 

  • सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग ३७, आरपीटीएस
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ३८, जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र

गांधीबाग 

  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ८, मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग १९, भालदारपुरा प्रा. आरोग्य केंद्र

सतरंजीपुरा 

  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २०, जागनाथ बुधवारी आरोग्य केंद्र
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २१, शांतीनगर प्रा. आरोग्य केंद्र

नेहरूनगर 

  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २६, नंदनवन प्रा. आरोग्य केंद्र
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ३०, बिडीपेठ प्रा. आरोग्य केंद्र

लकडगंज

  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २५, पारडी प्रा. आरोग्य केंद्र
  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग २४, डिप्टी सिग्नल प्रा. आरोग्य केंद्र

धंतोली 

  • सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत प्रभाग ३३, बाबुळखेडा प्रा. आरोग्य केंद्र.

आशीनगर

  • सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रभाग सात, पाचपावली पोलिस क्वार्टर

(याशिवाय महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत)


संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT