education Medical admission  sakal
नागपूर

Medical Admissions : एनआरआय कोट्यासाठी पाचपट शुल्क,अंतिम तारखेच्या पाच दिवसांपूर्वी परिपत्रक

Medical Admissions : एनआरआय कोट्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पाचपट शुल्कवाढ केली असुन सरकारने अंतिम तारखेच्या काही दिवस आधी अचानक परिपत्रक काढून हा निर्णय घेतला, ज्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना लाभ मिळवून देण्याचे धोरण सध्या राज्य सरकारचे असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथीसारख्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एनआरआय कोट्यात अचानक शुल्कवाढ करण्यात आली असून, महाविद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांकडून पाचपट शुल्क घेण्याची मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी हे शुल्क तिप्पट वाढ करण्याची मुभा होती.

वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या वतीने आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ९ सप्टेंबरपासून जागांची माहिती प्रकाशित करण्यात आली. त्यानंतर ९ ते ११ सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा पसंतीक्रम भरावयाचा होता. त्यानंतर १३ सप्टेंबरला निवड यादी लावण्यात आली. दरम्यान याच दिवशी राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाच्या वतीने खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांना एनआरआय कोट्याच्या प्रवेश शुल्कवाढीसंदर्भात शुल्क नियामक समितीच्या माध्यमातून एक परिपत्रक काढले.

यात इन्स्टिट्यूशनल आणि एनआरआय कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडून पाचपट शुल्क आकारण्याची मुभा देण्यात आली. विशेष म्हणजे, त्यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख बुधवार म्हणजे, १८ सप्टेंबर ठेवण्यात आली. त्यामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी या प्रवेशासाठी महाविद्यालयांना तिप्पट वाढ करण्याची मुभा होती. मात्र, अचानक प्रवेशाच्या वेळी अशा प्रकारची वाढ केल्याने विद्यार्थ्यांवरही मोठा अन्याय झाल्याचे दिसून येते.

इतक्या कमी वेळात कसे द्यावे पैसे

पाच दिवसांत शुल्कामध्ये वाढ झाल्याने प्रवेशासाठी लावून ठेवलेल्या रकमेपेक्षा अधिकची रक्कम भरावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांना कसरत करावी लागणार आहे. अनेकांनी गेल्यावर्षीच्या रकमेप्रमाणे पाल्याला या अभ्यासक्रमात प्रवेश मिळावा यासाठी जोडतोड करून पैसे जमा केले. आता अतिरिक्त पैसे कसे आणणार यामुळे अनेकांना प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे सरकारही खासगी महाविद्यालयांसाठी काम करते का? असा प्रश्‍न पालकांकडून उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT