नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, एकाच दिवशी १९ जणांना लागण sakal
नागपूर

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, एकाच दिवशी १९ जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मंगळवारी एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित आढळले असून सक्रिय रुग्णांचा आकडा ८१ एवढा झाला आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या शहरातील चौघांच्या नमून्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.

नागपूर जिल्ह्यात २ हजार ९४१ कोरोना चाचण्या झाल्या असून १९ जण बाधित आले आहेत. यात शहरातील १६ जण आणि ग्रामीण भागातील २ जण बाधित झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८१ वर पोहचली आहे.

विशेष असे की, अवघ्या दोन जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात मागील २० महिन्यात ४ लाख ९३ हजार ६८४ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील ४ लाख ८३ हजार ४८१ जणांनी कोरोनावर मात केली. तर १० हजार १२२ जणांचा मृत्यू झाला. ओमिक्रॉनच्या नव्या व्हेरियंटचा धोका असल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे.

चिंतेत वाढ

जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या दीड महिन्यापुर्वी ३९ वर आली होती, परंतु कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून ती ८१ वर पोहचली आहे. यात शहरातील ६२ कोरोनाबाधित आहेत. १६ जण ग्रामीण भागातील असून उर्वरित ३ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.

लग्नातून संसर्ग

महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून ३० जण हैद्राबाद येथे लग्न समारंभासाठी गेले होते. यात शिवाजीनगरातील ९ जणांचा समावेश होता. याच लग्नातून त्यांना लागण झाली असावी, असे सांगण्यात आले. या सर्वांवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नागपुरात त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्यात येणार आहे, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: ''समाजात आपण कुणालातरी गुरु मानत असतो...'' राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकरांनी दिलं स्पष्टीकरण

Shivajinagar News : नंबरप्लेटवर चिखल फासून होतेय दिशाभूल; महापालिकेचा फलक लावून शहरात बेकायदा राडारोड्याची वाहतूक

Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Pimpri News : ‘मेट्रो मार्गिका-३’ चे काम अंतिम टप्प्यात! हिंजवडी मेट्रोची १२ स्थानके मेपर्यंत सुरू करण्याचे उद्दिष्ट; पीएमआरडीए आयुक्तांकडून पाहणी

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

SCROLL FOR NEXT