number of crimes are increased in Nagpur  
नागपूर

उपराजधानीत वाढले गुन्ह्यांचे प्रमाण; कुठे ब्लेडने हल्ला तर कुठे पेटवल्या गाड्या 

अनिल कांबळे

नागपूर ः पत्नीने सोबत राहायला नकार देत माहेर गाठले. त्यामुळे पतीने सासरी जाऊन धिंगाणा घातला. एवढेच नव्हे तर पतीने पत्नीच्या भावाची आणि वहिनीच्या दुचाकीवर राग काढत त्या पेटविल्या. ही घटना अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. निलेश योगेश हेडाऊ (४०) रा. तकीया वॉर्ड, भंडारा असे आरोपीचे नाव आहे. 

प्राप्त माहितीनुसार, मनीषा (३५) आणि निलेश यांच्यात काही कारणातून घरगुती वाद सुरू होता. या वादातून मनीषा या आपल्या माहेरी अजनी हद्दीतील बिनकर वसाहत येथे राहायला आल्या. आरोपी निलेश हा शनिवारी मनिषाला सोबत नेण्यासाठी सासरी आला. माझ्या सोबत राहा असे पत्नीला म्हटले पण तिने नकार दिला.

या कारणातून दोघांत वाद झाला. संतापलेल्या निलेशने मनिषाच्या भावाची पल्सर आणि त्याच्या वहिनीची मोपेड दुचाकी पेटवून दिली. याप्रकरणी मनीषा यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

माचीस न दिल्याने ब्लेडने हल्ला

सिगारेट पिण्यासाठी माचीस न दिल्यामुळे दोघांत वाद झाला आणि एकमेकांना शिवीगाळ केली. एका आरोपीने ब्लेडने दुसऱ्या युवकाच्या गालावर वार करून जखमी केले. ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.

अमीर बशीर शेख (३१) रा. मिनिमाता नगर हे छावणी पोलीस चौकी समोरील पानठेल्यावर सिगरेट पिण्यासाठी गेला होता. पानठेला बंद असल्याने तेथे उभा असलेला आरोपी शुभम मांढरे याला माचीस मागितली. त्याने माचीस नाही असे म्हटले. यावरून दोघांत बाचाबाची झाली. आरोपी शुभमने आपल्या जवळील बोटाच्या नखात असलेली ब्लेडने अमीरच्या गालावर वार करून गाल चिरला. याप्रकरणी अमीर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Tehsildar Death : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केजचे तहसीलदार जागीच ठार, महसूल विभागात शोककळा

Petrol Price Today: जागतिक बाजारात तेलाचे भाव घसरले! आज पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले का? जाणून घ्या ताजे दर

'मला 3 महिने कोंडून ठेवलं आणि...' सुप्रिया पाठारेंनी सांगितला धक्कादायक किस्सा, म्हणाल्या...'बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी...'

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीबाबत वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार- हर्षवर्धन सपकाळ

Pune Police Suspended : पुण्यात खाकीला लाज आणणारी घटना ! सेक्स रॅकेटमध्ये अडकवण्याची धमकी देत तरूण-तरुणींकडून उकळले पैसे, ३ पोलीस निलंबित

SCROLL FOR NEXT