file photo 
नागपूर

स्कॉर्पिओने पुलावर दिली धडक; नर्स दुचाकीसह पडली ३० फूट खाली...

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पागलखाना चौकातील पुलावर भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओने दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला धडक दिली. महिला थेट पुलावरून ३० फूट खाली फेकली गेली. दुचाकीचा चक्काचूर होऊन महिलेचा मृत्यू झाला. मंजूषा मारुती दलाल (३६, प्रसाद विहार, कलेक्टर कॉलनी, गोधनी) असे मृत महिलेचे नाव आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूषा दलाल या पंचशील चौकातील खासगी रुग्णालयात नर्स होत्या. गुरुवारी दुपारी दुचाकीने ड्यूटीवर जात होत्या. पागलखाना चौकातील उड्डाण पुलावर मागून भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात त्या थेट पुलावरून ३० फूट खाली फेकल्या गेल्या. दुचाकीचा चक्काचूर होऊन त्या गंभीर जखमी झाल्या. 

मंजूषा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी पुलाखाली कुणीही नसल्यामुळे अन्य कुणी जखमी झाला नाही. आरोपी चालक वाहनासह पसार झाला. त्याने मानकापूर चौकात वाहन सोडून पळ काढला. मंजूषा अविवहित होत्या. त्यांच्या बहीण नागपूर पोलिसांत वायरलेस विभागात कार्यरत आहेत. 

(संपादन : मेघराज मेश्राम) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

Pune fuel saving news : इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेचा पुढाकार; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मेट्रो, बस व कार पूलिंगचा अधिक वापर करण्याचे निर्देश

KKR vs MI Live: मुंबई इंडियन्सच्या गटांगळ्या! वरुण चक्रवर्थी आपल्याच सहकाऱ्यावर खवळला, कोलकाताच्या ड्रेसिंग रूममध्ये तणाव... Video

SCROLL FOR NEXT