nurses in hospital doing double shift as no manpower available Mayo Nagpur  
नागपूर

"आम्हालाही कुटुंब आहे, जीव आहे"; तोकड्या मनुष्यबळामुळे मेयोतील परिचारिका करताहेत डबल शिफ्ट  

केवल जीवनतारे

नागपूर :  राज्यात कोरोनाविरुद्ध डॉक्टर, परिचारिकांपासून तर आरोग्य सेवा देणारे कर्मचारी युद्धातील सैन्याप्रमाणे लढत आहेत. मात्र हे सैन्य तोकडे पडत आहे. याकडे प्रशासन दुर्लक्षकरीत आहे. कोविड वॉर्डात दर दिवसाला रुग्णांची संख्या वाढत आहे, मात्र त्या तुलनेत परिचर्यां संवर्गातील पदभरतीकडे शासन-प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. 

मेयोत अतिशय भयावह स्थिती असून येथील परिचारिकांना डबल ड्यूटी करावी लागत आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता, आम्हालाही परिवार आहे, आमचाही जीव आहे, आम्ही १२ ते १६ ड्युटी करीत आहोत. परिचारिकांचा प्रचंड तुटवडा आहे. मेडिकल आणि मेयोमध्ये सुमारे ६०० परिचारिकांची गरज आहे. 

कोरोना संकटामुळे दर दिवसाला रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच तुलने मनुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. डॉक्टरांचे मनुष्यबळ वाढवण्यात येते, मात्र परिचारिकांची संख्या वाढवण्यात येत नाही. मेयोत ५९२ खाटांसाठी सुमारे ४७५ परिचारिका आहेत. मात्र अलिकडे कोविड व इतर अशा एकूण ८०० पेक्षा जास्त खाटांची संख्या आहे. यामुळे तीन पाळ्यांमध्ये सुमारे ७०० परिचारिकांची गरज आहे. मात्र प्रशासनाकडून परिचारिकांच्या मागण्यांना केरची टोपली दाखवण्यात येत आहे. 

मेडिकलमध्येही हीच स्थिती आहे. मेडिकलमध्ये ९०० परिचारिका आहेत. यापैकी कोविड आणि नॉन कोविड अशी रुग्णांची संख्या प्रंचड वाढली आहे. डबल ड्युटी करण्यात येत असल्यामुळे या परिचारिकांचेही आरोग्य धोक्यात येणार आहे. डॉक्टरांनी आंदोलनाचा इशारा दिला. आता परिचारिकांनीही मेयो, मेडिकलमध्ये आंदोलनाचा इशारा दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

दोनशेवर परिचारिका कोरोनाबाधित 

मेडिकलमध्ये आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक परिचारिका कोरोनाबाधित झाल्या. यापैकी सद्या १३० परिचारिका कोरोनाबाधित आहेत. ९० परिचारिका सद्या विलगीकरणात आहेत. हीच स्थिती मेयो रुग्णालयात आहे. ८२ पदे रिक्त आहेत. मेडिकलमध्येही ११५ परिचारिकांची पदे रिक्त आहेत.  मेयोत पन्नास पेक्षा अधिक परिचारिका विलगीकरणात आहेत. यामुळे उर्वरित परिचारिकांच्या खांद्यावर रुग्णसेवेचा भार आला आहे. पदभरती न केल्यामुळे अशा विपरित परिणाम भोगावे लागत असल्याची टिका होत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT