Nana Patole  Esakal
नागपूर

Nana Patole : पनोतीवरून भाजप कार्यकर्त्यांचा गैरसमज! सरकारने ओबीसी व मराठ्यांमध्ये भांडण लावल्याचा नाना पटोले यांचं दावा

ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारने भांडण लावले आहे आहे. ते आता टोकाला गेले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - ओबीसी आणि मराठा समाजात राज्य सरकारने भांडण लावले आहे आहे. ते आता टोकाला गेले असून आरक्षणावरून सुरू असलेला धुमाकूळ थांबवण्यात यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

जरांगे आणि भुजबळ काय म्हणतात त्यावर आम्हाला बोलायचे नाही. दोन्ही समाजाला न्याय कसा देता येईल हे सरकारने ठरवावे. दोघांचे भांडण आता वैयक्तिक स्तरावर आले आहे. एकमेकांचा समाजवर टीकाटीपणी केली जात आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगली बाब नाही. कोणी सरकार पुरस्कृत बोलत असेल तर ते चुकीचे आहे. याबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट व सुसंगत आहे.

काँग्रेसने सत्तेवर आल्यास जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व समाजाला न्याय मिळेल. लोकसंख्येनुसार ओबीसींच्या आरक्षणात वाढ होईल आणि मराठा समाजाचा प्रश्नही सुटेल असाही दावा पटोले यांनी केला.

पनोतीवरून गैरसमज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीशाली नेते आहे. मात्र पनोती हा शब्द त्यांनी स्वतःला का लावून घेतला हे समजत नाही. त्यामुळे पनोती शब्द ट्रेडिंग झाला आहे. सर्वसामान्य लोक त्याचा वापर करीत आहे. काँग्रेसने मोदी यांच्याबद्धल हा शब्द वापरला नाही. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांनीच तसा समज करून घेतला असेही पटोले म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : डोकेदुखी वाढणार?अंतरवालीतील महिलेचा पोलिसांत मोठा दावा,प्रकरण काय?

India Selection Committee: रोहित शर्माचा जवळचा मित्र घेणार अजित आगरकरची जागा? गुवाहाटीतील मिटिंगमधील अनुपस्थितीने चर्चेला उधाण

मुलाचं Instagram अकाउंट पालकांना थेट पाहता येतं का? Metaचे नियम काय?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावा लागणार का?

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

SCROLL FOR NEXT