तायवाडे मागासवर्गीय आयोगाच्या राजीनाम्यावर ठाम, आता सरकार काय करणार? 
नागपूर

तायवाडे मागासवर्गीय आयोगाच्या राजीनाम्यावर ठाम, आता सरकार काय करणार?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आजच राजीनामा पाठवला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडीने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला असला तरी आपण राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा मागे घेणार नाही असे, डॉ. बबनराव तायवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ठामपणे सांगितले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे राजीनामा पाठवला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण द्यावे याकरिता आपण सातत्याने मागणी करीत आहोत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने सातत्याने आंदोलने केली जात आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला आणि अध्यादेश काढला तरी २७ टक्के आरक्षण ओबीसी समाजाला मिळणार नाही हे स्पष्ट आहे.

एससी आणि एसटी समाजाला लोकसंख्येनुसार आरक्षण दिले जाते. त्यांच्या आरक्षणाची टक्केवारी सुमारे ३० होते. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांची मर्यादा घातली असल्याने ओबीसींना २० टक्यांच्यावर आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे आयोगावर राहण्याचा आपणास नैतिक अधिकार नाही. आपण राजकारणी नाही. त्यामुळे हृदयपरिवर्तन वगैरे होऊन राजीनामा परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही तायवाडे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT