Ajit Pawar Sakal
नागपूर

Ajit Pawar : अजित पवार यांना ००१ क्रमांकाचे कार्यालय; विधानभवनातही विशेष कक्ष

जागा निश्चित; विधानभवनातही देणार विशेष कक्ष

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासोबतच विधानभवनातील कार्यालयही निश्चित झाले आहे. नवीन इमारतीत पहिल्याच माळ्यावर त्यांना कार्यालय देण्यात आले आहे. त्यांचा आवाका पाहता तीन मंत्र्यांचे कार्यालय त्यांना देण्यात आले.

राज्यात प्रथमच दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. त्यामुळे पवार यांच्यासाठी नव्याने उपमुख्यमंत्री निवास तयार करण्यात आले. सहपोलिस आयुक्त यांचा बंगला उपमुख्यमंत्री पवार यांच्यासाठी तयार करण्यात येत आहे.

तसेच विधानभवनातही त्यांच्यासाठी विशेष कार्यालय तयार करण्यात आले. त्यांच्या कार्यालयासाठी जुन्या व नवीन इमारतीमधील जागेचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. नवीन इमारतीत पहिल्याच माळ्यावर क्रमांक ००१ कार्यालय त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आले. येथे तीन मंत्र्यांसाठी कार्यालय तयार करण्यात आले होते. हे तिन्ही मिळून उपमुख्यमंत्री पवारांसाठी एक कार्यालय तयार करण्यात आले.

विधानभवनातील काम अंतिम टप्प्यात

७ डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होणार असून, येत्या सोमवारपासून सचिवालय नागपुरात दाखल होणार आहे. त्यासाठी विधानभवनातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या रविवारपर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. येथे गार्डनमध्ये नव्याने लॉन तयार करण्यात येत असून, सुंदर वृक्षही लावण्यात येणार आहे. १६० गाळ्यांचे अपूर्ण काम संथ गतीने सुरू असल्याने वरिष्ठांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे समजते.

पवारांनी घेतली निवास वाटप समितीची बैठक

रविभवनात मंत्र्यांसाठी कॉटेज असतात. हे कॉटेज वाटप करण्यासाठी निवास वाटप समितीची बैठक आज (ता. २१) पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्हीसीच्या माध्यमातून बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT