Officer of Hanuman Nagar zone sending people to BJPs corona testing camp  
नागपूर

इथेही राजकारण? 'कोरोना चाचणीसाठी जा भाजपच्या शिबिरात': चक्क झोनच्या अधिकारीच देताहेत सल्ला

राजेश चरपे

नागपूर : कोरोनासारख्या जीवघेण्या आजाराचे राजकारण करू नका असा सल्ला महाविकास आघाडीला देणाऱ्या भाजपने महापालिकेच्या हनुनाननगर झोनमध्ये करोना चाचणी केंद्र बंद केले आहे. येथील आरोग्य अधिकारी कोणी विचारणा करण्यास आल्यास भाजपच्या शिबिरात जाण्याचा सल्ला देत असल्याची धक्कादायक माहिती आहे. 

हनुमानगरच्या आरोग्य अधिकारी बकूल पांडे यांनी या झोनमधील महापालिकेचे अधिकृत करोना तपासणी केंद्र बंद केले आहे. या झोनमध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी एकही अधिकृत केंद्र उपलब्ध नाही. त्या भाजप वगळता एकही नगरसेवकांचे फोन उचलत नाही. शिवसेनेच्यावतीनेही त्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्याची कुठलीच दखल त्यांनी घेतली नाही. तुम्हाला करोना चाचणीच करायची आहे ना तर भाजपतर्फे सुरू असलेल्या शिबिरांमध्ये जाऊन करा असा सल्ला त्या देतात. 

हनुमानगर झोनमध्ये इतरही पक्षाचे नगरसेवक आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या उत्तराने तेसुद्धा हतबल झाले आहेत. अधिकारी भाजपच्या शिबिरात जाऊन तपासणी करण्याचा सल्ला कसा काय देऊ शकतात असा त्यांचा सवाल आहे. बकूल पांडे महापालिकेच्या अधिकारी आहेत. त्यांनी महापालिकेच्या नियमानुसार झोन अंतर्गत अधिकृत कोरोना चाचणी केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.  

ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी या संदर्भात तक्रार केली आहे. आरोग्य अधिकारी असताना नागरिकांना एका राजकीय पक्षाच्या शिबिरात जाऊन तपासणी करण्याचा सल्ला देणे अयोग्य आहे. त्यांना राजकारणच करायचे असेल तर राजीनामा देऊन पक्षाचे काम करावे. आपण या संदर्भात महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत. त्या नगरसेवकांचेसुद्धा फोन स्वीकारत नाही, असेही होले यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Bank Fraud : बँक कर्मचाऱ्यांची सतर्कता! जुन्या नाशिकमध्ये 'आरटीजीएस' फसवणुकीचा डाव उधळला

Rohit Pawar: लोकशाहीसाठी दंडुका हाथी घेऊ, आमदार रोहित पवार यांचा इशारा

Ichalkaranji Crime : अल्पवयीन मुलाचा इचलकरंजीत वडिलांच्या मित्रावर जीवघेणा हल्ला

Nashik COVID ICU Scam : ३.३७ कोटींच्या फसवणूक प्रकरणी नाशिकमध्ये अधिकाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार; अडचणी वाढल्या

Local Body Election: कधी लागणार आचारसंहिता? तीन टप्यात कशा होणार निवडणुका? मोठी माहिती आली समोर

SCROLL FOR NEXT