nagpur  
नागपूर

आयुक्त राधाकृष्णन यांचं तुकाराम मुंढेंच्या पावलावर पाऊल; कोरोनासंदर्भातील बैठकीपासून पदाधिकारी दूरच 

राजेश प्रायकर

नागपूर ः गेल्या काही दिवसांत वाढत्या कोरोनावर नियंत्रणासाठी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी बैठक घेतल्या. फिरणाऱ्या बाधितांवर गुन्हे दाखल करणे, पाच हजारांचा दंड करणे असे निर्णय आयुक्तांनी घेतले. परंतु, या महत्त्वाच्या बैठकीत नागपूरकरांचे प्रतिनिधित्व करीत असलेले महापौरदेखील उपस्थित नव्हते. एवढेच नव्हे कालच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत कुणीही पदाधिकारी नसल्याने आयुक्त राधाकृष्णन तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत असताना आयुक्त-पदाधिकारी संघर्ष वाढण्याची शक्यता बळावली आहे.

मागील वर्षी कोरोनाने थैमान घातले होते. या काळात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक निर्णय घेतले. विशेष म्हणजे त्यांच्या निर्णयावर नंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनीही टीका केली होती. ते एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. महापालिकेत सध्या मागील वर्षीचेच चित्र सुरू आहे. 

सध्या शहरात कोरोनाचा ज्वर वाढला आहे. त्याअनुषंगाने महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहेत. कोरोनावर नियंत्रणासाठी उपाययोजनासंदर्भात दररोज बैठकांचे सत्र सुरू आहे. नागरिकांच्या संबंधित निर्णयाच्या या बैठकांमध्ये मात्र महापौर व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नव्हती.

मंगळवारी आयुक्तांनी बैठक घेतली. या बैठकीत ज्या भागात बाधितांची संख्या जास्त असेल, तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. एवढेच नव्हे बाहेर फिरणाऱ्या बाधितांवर गुन्हे दाखल करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

काल, बुधवारी कोव्हिड संदर्भात टास्क फोर्स कमिटीची बैठक मनपा मुख्यालयातील ‘कोरोना वार रूम’मध्ये पार पडली. या महत्त्वाच्या बैठकीला महापौर किंवा इतर पदाधिकारी उपस्थित नव्हते. थेट नागरिकांच्या संबंधित निर्णय घेताना महापौर व पदाधिकाऱ्यांशीही समन्वय ठेवण्यात येत नसल्याने काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. 

पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय राखल्यास प्रशासनाचाच ताण काही प्रमाणात हलका होऊ शकते, असे नमुद करीत आयुक्त राधाकृष्णन तत्कालीन आयुक्त मुंढेंसारखेच वागत असल्याची टीका एका पदाधिकाऱ्याने केली. त्यामुळे आयुक्त व पदाधिकारी संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

महापौरांनी घेतलेल्या बैठकीला तुकाराम मुंढे येत नव्हते. ते स्वतः समांतर बैठक घेत होते. आता उद्या महापौर दयाशंकर तिवारी यांनी बैठक बोलावली असून आयुक्तांनाही आमंत्रित केले आहे. त्यामुळे कोरोनासंदर्भातील प्रशासनाची तयारी किंवा स्थितीचे निरीक्षण आयुक्त उद्या महापौरांपुढे मांडतील, अशी अपेक्षा आहे.
- अविनाश ठाकरे, 
सत्तापक्ष नेते, महापालिका.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT