No lockdown in Nagpur now, officials decide 
नागपूर

नागपुरातील लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांनी घेतला हा मोठा निर्णय...

नीलेश डोये

नागपूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊनवरून जिल्ह्यात उलट सुलट चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शहरात लॉकडाऊन लागणार असल्याची अफवा पसरली होती. महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरात लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले होते. याला विरोधही झाला.  त्यामुळे लॉकडाऊन लागणार की नाही यासंदर्भात लोकांमध्ये उत्सुकता आहे. ही उत्सुकता संपली आहे. 

 नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप 

कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता तर रोज ३०० च्या वर रुग्ण समोर येत आहेत. यावर  उपाय म्हणून  काही जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु त्या नंतरही रुग्ण संख्या आटोक्यात आली नसल्याचे समोर आले. उलट नागरिकांची गैरसोय झाल्याचा आरोप झाला. नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे लॉकडाऊनच्या करण्यासाठी आग्रही होते, तसे त्यांनी संकेत दिले होते. ग्रामीण भागात लॉकडाऊन करण्यास जिल्हाधिकारी यांनी आधीच स्पष्ट नकार दिला होता. 

अधिकाऱ्यांच्या समितीने चर्चेअती घेतला निर्णय 


शहरात लॉकडाऊन करण्यात अनेकांनी विरोध दर्शविला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी टिकास्त्र सोडले होते. लॉकडाऊन स्मार्ट असेल, असे पालकमंत्री यांनी सांगितले होते. तसेच लॉकडाउन करण्याबाबत  निर्णय घेण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली. यात विभागीय आयुक्त संजीव कुमार, मनपा  आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय, पोलिस अधीक्षक राकेश ओला आदींचा समावेश होता. अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. या लॉकडाउनसंदर्भात चर्चा झाली. लॉकडाऊनमुळे होणारे परिणाम, दुष्परिणाम यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचे झाल्यास कशा प्रकारे करावे, काय सरू राहील, काय बंद ठेवायचे यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. यात जवळपास सर्वांनीच नकारात्मता दर्शविली. त्यामुळे शहरात लॉकडाऊन लागू न करण्याचा निर्णय वरिष्ट अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
 

 
बैठकीत चर्चा
अधिकाऱ्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. लॉकडाऊनमुळे होणारे परिणाम, दुष्परिणाम यावर चर्चा झाली. लॉकडाऊन करायचे झाल्यास कशा प्रकारे करावे, काय सरू राहील, काय बंद ठेवायचे यावरही चर्चा झाली. लॉकडाऊन न करण्याचा निश्चित झाले.
संजीव कुमार, विभागीय आयुक्त   

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Survey 2025: महायुती सरकारची वर्षपूर्ती! मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांची कामगिरी कशी होती?

Latest Marathi News Live Update : हिजाब आणि बुरखा विरोधात गोरेगावमध्ये मनसे आक्रमक

Redmi 15C 5G मोबाईल लॉन्च! 'या' तारखेपासून विक्री सुरू; 12 हजारात बेस्ट कॅमेरा अन् 6300 mAh मोठी बॅटरी, 50 हजारच्या फोनचे फीचर्स

Indigo Issues: मतभेद, अंतर्गत अस्थिरता अन्... देशातील सर्वात मोठी एअरलाइन संकटात! इंडिगोचा मालक कोण? समस्यांनी का वेढलं? वाचा...

Digital Banking : डिजिटल बँकिंगचे नवे नियम 1 जानेवारीपासून लागू! तुमच्या ऑनलाइन बँकिंगमध्ये काय बदलणार?

SCROLL FOR NEXT