आत्माराम मोतीराम ठवकर आत्माराम मोतीराम ठवकर
नागपूर

८० वर्षीय वृद्धाने घेतली अग्निसमाधी; रात्रभर घेतला नाटकाचा आनंद

सकाळ डिजिटल टीम

कुही (जि. नागपूर) : मंगळवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. अशात एका वृद्धाने स्वतःला शेतात जाळून घेतल्याची (committed suicide) घटना उघडकीस आली. ही घटना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील किन्ही गावात मंगळवारी (ता. १) मार्चला घडली. आत्माराम मोतीराम ठवकर (८०) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, आत्माराम ठवकर हे वारकरी होते. धार्मिक वृत्तीचे होते. ते नेहमी आजारी राहत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चांगली राहत होती. आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्र गावात मंडईनिमित्त सुरू असलेल्या झाडीपट्टीतील नाटकाचा आनंद त्यांनी घेतला. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ते शेतात गेले.

शेतात असलेले लाकडं एकत्र करून त्याचे सरण रचले. त्यावर तनस टाकली. यानंतर सरण पेटवून त्यावर ते झोपले. यात त्यांचे शरीर अर्धवट जळाले. यातच त्यांचा मृत्यू (committed suicide) झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी विधिवत पूजा केल्याचे बोलले जात आहे. कारण, सरणाजवळ दिवा पेटत होता. तसेच पानाचा विडाही ठेवलेला होता. माहिती मिळताच वेलतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथे पाठविले.

मृत्यूला कवटाळल्यामुळे शंकाकुशंका

वृद्ध माणूस स्वतःला जाळून घेण्याचा विचार कसा काय करू शकतो तेही स्वतःचे सरण रचून? हा प्रश्न गावभर चर्चेला जात आहे. वृद्धाने स्वतःला आगीच्या स्वाधीन करून मृत्यूला कवटाळल्यामुळे शंकाकुशंका उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार आनंद कविराज यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलिस निरीक्षक नितेश डोर्लीकर व बीट जमादार सुरपाम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT