old woman is no more in accident in Nagpur  
नागपूर

दुर्दैवी! पोटच्या मुलाच्या मांडीवरच आईनं सोडला प्राण; काटोल नाक्याजवळ झाला भीषण अपघात 

अनिल कांबळे

नागपूर ः भरधाव ट्रकने एका ट्रिपलसीट दुचाकीला धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या आईने मुलाच्या मांडीवरच जीव सोडला तर त्याच्यासह मुलगी गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना रविवारी रात्री अकरा वाजता नवीन काटोल नाका परिसरात घडली.

शांताबाई बाबाराव बरडे (वय ६५ रा.दर्शन कॉलनी ) असे मृताचे तर सुधीर बाबाराव बरडे (वय ४०) व त्यांची मुलगी नंदिनी (वय ५) अशी जखमींचे नाव आहेत. रविवारी रात्री सुधीर, त्यांची आई व मुलगी हे कळमेश्वर येथून मोटरसायकलने येत होते. 

नवीन काटोल नाका परिसरात अज्ञात ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली आल्याने शांताबाई गंभीर जखमी झाल्या. मुलाने जखमी आईला मांडीवर घेतले. दरम्यान शांताबाई यांनी प्राण सोडला. 

तर सुधीर व नंदिनी दुसऱ्या बाजूला पडल्याने जखमी झाले. याप्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रकचालकाचा शोध सुरू केला आहे. 

संपादन  - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT