police  Pix_Pratik
नागपूर

नागपूरकरांनो सावधान! बाहेर फिरलात तर होणार कोरोना टेस्ट; १८ बाधित विलगीकरणात रवाना

अनिल कांबळे

नागपूर : लॉकडाउनला नागपूरकरांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे पोलिसांनाच आता आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना ॲंटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला. आज शनिवारी पहिल्याच दिवशी २५५ जणांची टेस्ट केली असता त्यात तब्बल १८ जण करोनाबाधित निघाले. त्यांना ताबडतोब पोलिसांनी व्यवस्था केलेल्या विलगीकरणात रवाना केले आहे.

कोरोनाची परिस्थिती हाताळताना शहरातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासनही हतबल झाले आहे. उपचार,ऑक्सिजन व औषधांच्या अभावानेच लोकांचा मृत्यू होत आहे. या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यात संचारबंदी जाहीर करण्यात आली. त्यानंतरही लोकांकडून नियमांचे पालन करण्यात येत नसल्याने पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत.

ठिकठिकाणी नाकाबंदी लावली असून विनाकारण फिरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. या प्रयत्नानंतरही रस्त्यावरील गर्दी कमी होताना दिसत नसल्याने पोलिसांनी आता नाकाबंदीच्या ठिकाणीच विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. जुना काटोल नाका, ऑटोमोटीव्ह चौक, मेयो चौक, मानेवाडा चौक आणि प्रतापनगर चौकात महापालिकेच्या मदतीने अँटीजेन कोरोना चाचणी करण्यात आली.

या ठिकाणी अनुक्रमे शहरातील पोलिस उपायुक्त विनिता शाहु, नीलोत्पल, लोहित मतानी, विवेक मासळ आणि नुरुल हसन यांनी नेतृत्व केले. स्वतः डीसीपींनी पोलिसांनी रस्त्याने ये जा करणाऱ्यांची चौकशी केली असता कुणी किराणा घ्यायला, कुणी औषधासाठी जाताना दिसले. बऱ्याच प्रमाणात लोक कामावर जाण्यासाठी निघाले होते. विनाकारण फिरणाऱ्या २५५ जणांची टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी १८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना ताबडतोब १४ दिवसांकरिता विलगीकरणात पाठवण्यात आले आहे.

५०० वाहने जप्त

पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याशिवाय इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली. मास्क न घालणाऱ्या ३४७, सुरक्षित अंतर नियम न पाळणारे ७८० जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तर ५०० वाहने जप्त करण्यात आली. उद्यापासून आणखी कडक कारवाई होणार आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोलिसांनीसुद्धा कंबर कसली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरल्यास कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार असून शहरातील इतर नाकाबंदीच्या ठिकाणीही ही चाचणी करण्यात येईल. त्यामुळे रस्त्यावर विनाकारण बसणाऱ्यांवर नियंत्रण मिळवता येईल.
- अमितेश कुमार (पोलिस आयुक्त)

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT