On the first day of school many students Absent
On the first day of school many students Absent sakal
नागपूर

नागपूर : पहिल्याच दिवशी अनेक ‘विद्यार्थ्यांची बुट्टी’

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर महापालिकेने १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात रात्री काढलेले आदेश आणि पालकांमध्ये असलेल्या कोरोनाच्या भीतीमुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी बुट्टी मारली. महापालिकेने उशिरा आदेश काढल्यामुळे विद्यार्थ्यांना संदेश पाठवणे, त्यांच्याकडून संमती पत्र घेणे आदींचा परिणाम पहिल्या दिवशी शाळांच्या उपस्थितीवर दिसून आला. अशीच स्थिती शहरातील महाविद्यालयांमध्येही होती.

नागपूर महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याची सूचना केली. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेही महाविद्यालये सुरू करण्याचे परिपत्रक काढले. आदेश ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी काढण्यात आले. त्यामुळे, शाळा आणि पालक अशा दोन्ही गटांनी या आवाहनाला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासंदर्भात अद्याप निरोप दिलेले नाही. बहुतांश शाळांनी ७ फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष स्वरूपात शाळेत बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तुर्तास शहरातील शाळांमध्ये प्रतिसाद दिसला नाही. शाळांसारखीच परिस्थिती नागपूर शहरातील महाविद्यालयांमध्येही होती. तेथेही पहिल्या दिवशी विद्यार्थी फिरकले नाहीत. सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. या परीक्षा होईपर्यंत विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष वर्गांसाठी उपस्थित राहण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. त्यामुळे, विद्यापीठाने प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची सूचना केली असली तरी तिला तातडीने विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळतील अशी चिन्हे नाहीत.

ऑफलाइनचा धोका नकोरे बाबा

शहरात मोठ्या संख्येने सध्या ताप, सर्दी, खोकला यांचे रुग्ण दिसून येत आहेत. याचा परिणाम शाळांवरही पडला आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आजारी पडले असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, तातडीने ऑफलाइन वर्ग सुरू करून धोका पत्करण्याच्या तयारीत कुणीही नाही. त्यामुळे, मंगळवारी बहुतांश शाळांमध्ये कुणीही विद्यार्थी उपस्थित राहिले नाहीत. सगळ्याच शाळांमध्ये ऑनलाइन स्वरूपातच वर्ग घेण्यात आले.

वाडीच्या शाळेत १० विद्यार्थी

जवळपास महिन्याभरापासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या. गुरुवारी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची हजेरी बोटावर मोजण्या एवढी आढळून आली. सुरू झालेल्या शाळेला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद दिसून आला. वाडी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत हे वास्तव पुढे आले. या शाळेत केवळ १० विद्यार्थ्यांची हजेरी पहिल्या दिवशी दिसून आली. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १ ते १२ वर्गाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यासंदर्भात आदेश काढत १ फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा प्रशासनाने विविध पातळीवर शाळा व पालक यांचे मनोगत जाणून घेतले आहे. टास्क फोर्स कडूनही बाधित संख्या कमी होईल, असे संकेत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घ्यायचे आहे.

निर्जंतुकीकरण झाले नाही

शाळा सुरू करताना सर्व वर्ग स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे. मात्र, अचानक निर्देश मिळाल्याने वाडी जि.प. शाळेत निर्जंतुकीकरण झाले नसल्याचे शिक्षकांनी सांगितले.

शाळेत येण्याबाबत विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला आहे. मात्र, प्रशासनाने उशिरा पत्राद्वारे सूचना केल्याने आज पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. शाळा सुरू झाल्याचे पालकांना सूचित केल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढेल.

- रजनी चौधरी, मुख्याध्यापक, जि.प. शाळा वाडी

मोबाईल मधल्या अभ्यासापेक्षा शाळेतील अभ्यास चांगला वाटतो. घरी करमत नव्हते. शाळेत आल्यानंतर शिक्षणातील नवनवीन गोष्टी माहिती होण्याबरोबरच करमणूक सुद्धा होत असल्याचे मत सोनम बोरकर व सुशांत धारगावे या सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जीव दे म्हटलं म्हणून एखाद्याने खरंच जीवन संपवलं तर काय? हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Instagram Algorithm : इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल; ओरिजिनल कंटेंट होणार प्रमोट.. मात्र यूजर्सचं टेन्शन वाढणार!

Namrata Sambherao: "महाराष्ट्राची लाडकी नमा..."; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरनं नम्रता संभेरावला लिहिलं खास पत्र

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT