One dies due to lack of treatment in Nagpur 
नागपूर

मित्राची धडपड सुरूच होती, पण नियती कठोर झाली; उपचारापूर्वीच मित्राने मित्राच्या पाठीवर सोडले प्राण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : वय अवघे ४० वर्ष... कुटुंबातील कर्ता व्यक्ती... घरात पत्नी व एक लहान मुलगी... पेंटिंगचे काम करून कुटुंबाचा गाडा हाकायचा... कामावर असतानाच अचानक छातीत दुखायला लागले... परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मित्राने त्याला दुचाकीवर बसवून दवाखान्यात नेण्याची धडपड चालवली... मित्राला काही होऊ द्यायचे नाही, यासाठी प्रयत्नही खूप केले... पण, नियती कठोर झाली... रस्त्यात एक दवाखाना दिसला, पण तोही बंद होता... अखेर त्याने दुचाकीवर बसून जात असतानाच मित्राच्या पाठीवर मान टाकली अन् अखेरचा श्वास घेतला...

मित्राने पाठीवर मान टाकल्यानंतरही त्याला कसेबसे सावरत सहकारी मित्र त्याला मेडिकलमध्ये घेऊन गेला. तोपर्यंत आपला मित्र आता या जगात नसल्याची त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे मित्राला वाचविण्याची त्याची धडपड सुरूच होती. शेवटी मेडिकलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अमलेश चरणदास मेश्राम (वय ४०, रा. कृष्णधाम, मानकापूर, नागपूर) असे मृत पेंटरचे नाव आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमलेश मेश्राम हे त्याचा एक सहकारी ज्ञानेश्वर देवराव गेडाम यांच्यासोबत पृथ्वीधामनगर, बेलतरोडी येथील देशमुख यांच्या घरी पेंटिंगचे काम करीत होते. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक मेश्राम यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनी हे घरमालक देशमुख यांना सांगितले. त्यांनी मेश्राम यांना घरात बोलावून चहा दिला आणि थोडावेळ आराम करण्यास सांगितले.

पण, मेश्राम यांना काही बरे वाटत नसल्याचे सहकारी गेडाम यांना सांगितले. त्यांनी लगेच दुचाकी काढली आणि मेश्राम यांना मागे बसवून दवाखान्यात नेण्यासाठी धडपड सुरू केली. बेलतरोडी रोडवर त्यांना डॉ. पराग जोशी यांचे हॉस्पिटल दिसले, पण बंद असल्याने ते मेडिकलमध्ये जाण्यासाठी निघाले. मेश्राम यांना आधाराने दुचाकीवर बसविले.

थोडे अंतर जात नाही तोच मेश्राम यांनी दुचाकी चालविणाऱ्या गेडाम यांच्या पाठीवर मान टाकली. त्यांचा मृत्यू झाला होता. पण, मित्र हिंमत हारला नव्हता. दुचाकी चालवित तो त्यांना धीर देत होता. अखेर तो त्यांना कसाबसा मेडिकलमध्ये घेऊन गेला. पण, डॉक्टरांनी मेश्राम यांना मृत घोषित केले.

मेश्राम यांना पत्नी आणि एक मुलगी आहे. याप्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर देवराव गेडाम (वय ५२, रा. हिलटॉप, सुदामनगरी, नागपूर) यांनी दिलेल्या सूचनेवरून बेलतरोडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT