death file photo
नागपूर

‘और थोडी थोडी लेंगे’; दारूच्या नशेत पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

संदीप गौरखेडे

कोदामेंढी (जि. नागपूर) : मित्रांनी मस्त दारू ढोकसली (Alcohol party). नदीच्या पात्रात पाच मित्र पोहायला गेले. नदी किनारी गेल्यावर ‘और थोडी थोडी लेंगे’ असा बेत केला आणि सुरनदीच्या पात्रात पोहायला गेले. अशातच पाण्याचा अंत न लागल्याने एकाचा नदीत बुडून मृत्यू (One drowned in the river) झाला. प्रशांत संग्राम गेडाम (वय २४ ) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत अरोली पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तांडा येथील रहिवासी आहे. (Death-of-a-young-man-by-drowning)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास पाचही मित्रांनी सोबत दारू पार्टी केली. नंतर नदीत पोहण्याचा बेत आखला. पाचही मित्र सुरनदीत पोहायला गेले. पोहता पोहता आणखी थोडी थोडी दारू प्यायले. दारूच्या नशेत पोहत असताना प्रशांत याने गटांगळ्या टाकल्या. मित्रांनी त्याला पाण्याच्या बाहेर काढले. नाका तोंडात शिरलेले थोडेफार पाणि कसेबसे त्यांनी काढले आणि त्याला घरी नेवून झोपवून ठेवले.

प्रशांत याची आई आणि घरचे मंडळी नातेवाईकाकडे गावाला गेले होते. तो घरी एकटाच झोपून होता. याबाबत रात्रीच्या सुमारास कुणीतरी अरोली पोलिस ठाण्यात सूचना दिली. यावरून ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरक्षक ऋषिकेश चाबुकस्वार, राजू पुडके, संतोष महंत यांनी घटनास्थळ गाठले असता प्रशांत मृत अवस्थेत आढळून आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथे हलविण्यात आले. उत्तरीय तपासणीच्या अहवालावरून डॉक्टरांनी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे कळविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

(Death-of-a-young-man-by-drowning)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT