crime 
नागपूर

नवीन कामठीत अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची लागोपाठ दुसरी घटना!

सतीश दहाट

कामठी(जि. नागपूर) : महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोणतेही कठारे कायदे किंवा गुन्हेगारांना झालेल्या शिक्षा यामुळेही समाजाला कलंक असलेले हे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. हे विकृत लहान मुलींनाही सोडत नाहीत. स्वत:च्या घरीही महिला सुरक्षित नाहीत की काय, असा प्रश्‍न पडावा, इतके या घटनांचे स्वरुप दिवसेंदिवस भयावह होत चालले आहे.

नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गा चौक येरखेडा येथे पाहुणी म्हणून आलेल्या सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या घटनेला आठवडा उलटत नाही तोच रविदासनगर येरखेडा येथे व्हिडिओ गेम खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलवून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस नवीन कामठी पोलिसांनी अटक केली.

नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सिनू विजय जनबंधु (19) रा. रविदासनगर येरखेडा याने 15 जुलैला दुपारी दोनच्या सुमारास घरी कोणी नसल्याची संधी साधून शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला मोबाईलवर व्हिडिओ गेम खेळण्याचा बहाण्याने आपल्या घरी बोलावले आणि अत्याचार केला. वरून आरोपी तरुणाने त्या अल्पवयीन मुलीला हे कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर आरोपीने अत्याचार करतानाचा व्हिडीओ तयार केला होता.

सविस्तर वाचा - एक महिन्यापासून तो होता बेपत्ता! शेवटी...

22 जुलै रोजी आरोपी तरुणाने अत्याचाराचा व्हिडीओ रविदासनगरातील काही मित्रांना दाखविल्याने अत्याचाराची माहिती अल्पवयीन मुलीच्या आईला कळली.आईने मुलीला घटनेसंदर्भात बोलते केले असता मुलीने आईला घडलेली घटना सांगितली. आईने मुलीसह नवीन कामठी पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात अत्याचाराची तक्रार केली असता पोलिसांनी कलम 342,354,376, (2 ) (आय) 506, 509, सहकलम 4,8,10,12,पास्को बाल लैंगिक कायदा आणि 67( ब) माहिती तंत्रज्ञान कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करून आरोपी सिनू विजय जनबंधु यास अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शीतल चामले यांनी केली.  

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Patil : 'शरद पवार गट सोबत आला तर विचार करू'; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान, काँग्रेसला डावलून 'महायुती'चा सत्तेसाठी नवा फॉर्म्युला!

Earth : पृथ्वीच्या खाली आहे अदृश्य ढाल; जी सगळ्या संकटांपासून आपल्याला ठेवते दूर, नव्या संशोधनातून रहस्यमय खुलासा, पाहा सविस्तर

Viral Video: पहिल्यांदाच ब्लिंकिटवर ऑर्डर! काकूंची प्रतिक्रिया पाहून नेटकरी झाले फिदा, व्हिडिओ व्हायरल

Kolhapur crime news : इचलकरंजी पोलिसांनी घरफोड्या उघडकीस आणल्या पण एसपींनी पोलिसांचीच चौकशी लावली

Russia–US New START Expiry Explained: भयानक इशारा! रशिया–अमेरिका अणु करार संपला, जग पुन्हा न्यूक्लिअर धोक्याच्या उंबरठ्यावर

SCROLL FOR NEXT