onian onian
नागपूर

कांदा रडवणार; ६० ते ७० रुपये प्रति किलो होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यातील सततच्या पावसामुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात सध्या सुमार दर्जाचा कांदा येत आहे. कांद्याची आवक कमी झालेली असतान मागणी वाढल्याने कांद्याचे भाव वाढले आहेत. गेल्या आठवड्यात तीस रुपये प्रति किलो असलेला कांदा ५० रुपये किलोवर गेला आहे. सुमार दर्जाचा कांदाही ४० रुपये प्रति किलो झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर कांदा ६० ते ७० रुपये प्रति किलो होण्याची शक्यता आहे.

कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या स्थानिक कांद्याची आवक कमी आहे. मागणीच्या तुलनेत कांदा कमी येत असल्याने इतर राज्यातून कांद्याची आवक सुरू झालेली आहे. सध्या ठोक बाजारात पांढऱ्या कांद्याची ४० किलोचे पोते ४५० ते ८५० रुपये तर लाल कांदा ४०० ते ९०० रुपयांत खरेदी केला जात आहे. नव्याने येत असलेला कांदा पावसामुळे ओला झालेला आहे. त्याचा दर्जा घसरला आहे. यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. दर्जेदार कांद्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत आहे.

ठोक बाजारात कांदा महागल्याने किरकोळ बाजारातही भाव वाढलेले आहे. सध्या किरकोळ बाजारात पांढरा कांदा पन्नास ते साठ रुपये तर लाल कांदा तीस ते चाळीस रुपये किलो विकला जात आहे. ठोक व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक केली असून जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण केला आहे. त्यातच तेलंगणासह इतर राज्यातील मुसळधार पावसामुळे नवे कांद्याचे पीक खराब झाले आहे. त्यामुळे दरात तेजी दिसत आहे. पूर्वीच्या तुलनेत सध्या कळमना बाजारात कांद्याची आवक कमी झालेली आहे. सणासुदीच्या काळात कांदा ६० ते ७० रुपयांवर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

नवरा-मुलीचा मृत्यू, समाजाचे टोमणे अन् डोळ्याला दुखापत; तरीही RAS मध्ये मिळवलं मोठं यश.... रोहिणी गुर्जर यांची जिद्दीची कहाणी

Maharashtra Weather : ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम, मात्र काही जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट; जाणून घ्या IMD चा अंदाज

SCROLL FOR NEXT