Farmers sakal
नागपूर

Nagpur : ५० टक्केच शेतकऱ्यांना कर्ज वाटप; पावसालाही विलंब उद्दिष्ट गाठण्यात बँका अनुत्सूक

पावसाला झालेल्या विलंबाचा पेरण्यांवर परिणाम झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Nagpur : खरीप हंगाम सुरू झाला आहे. पावसाला झालेल्या विलंबाचा पेरण्यांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पेरण्या आटोपण्याची घाई शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु त्यांना कर्ज देण्यास बॅंकांकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नसल्याचे दिसते. आतापर्यंत बॅंकांकडून फक्त ५० टक्केच कर्ज वाटप करण्यात आले आहे.

यावेळी पावसाला विलंब झाला. त्यामुळे पेरण्यांनाही उशीर झाला आहे. आता पेरण्यां सुरू झाल्या आहेत. पण शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास होत असलेल्या विलंबाचा फटका पेरण्यांना बसत असल्याची चर्चा आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने त्यांना साहित्य खरेदी करता आलेले नाही.

त्यामुळे नाईलाज होऊन अनेक शेतकऱ्यांना सावकारांकडे जावे लागत असल्याचे वास्तव आहे. शासनाने दोनदा कर्जमाफी दिली. त्यामुळे कर्ज वाटपाचा आकडा वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु बॅंका फारशा उत्सुक नसल्याचे दिसते.

बॅंकाकडून मिळत नाही सहकार्य

यावर्षी नागपूर जिल्ह्याला १ हजार ४३० कोटी ६६ लाख रुपये कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट होते. साधारणतः १ लाख २२ हजार ९२६ शेतकऱ्यांना हे कर्ज वितरित होईल, अशी अपेक्षा होती. ३० जूनपर्यंत ५२ हजार २३३ शेतकऱ्यांना ७१७ कोटी ४३ लाखांचे कर्ज वाटप झाले. हे उद्दिष्टाच्या ५० टक्केच आहे.

काही बॅंकांनी ४० टक्केही उद्दिष्ट गाठलेले नाही. बॅंकाकडून कर्ज पुरवठ्यासाठी एकप्रकारे सहकार्य केले जात नसल्याचे दिसूव येत आहे. त्यामुळे अशा बॅंकांवर कोणती कारवाई होते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुकास्तरीय शिबिरही झाले बंद

तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पीक कर्ज वाटपासाठी तालुकास्तरावर शिबिरांचे आयोजन सुरू केले होते. बॅंक, सहकार, महसूल व संबंधित विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहायचे. त्यामुळे कर्ज मिळण्यास शेतकऱ्यांना सोयीचे होत असे.

परंतु अलीकडच्या काही वर्षांत शिबिरांचे आयोजन बंद झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी अनेक ठिकाणी चकरा माराव्या लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Pollution Crisis : नागपूरचा श्वास गुदमरतोय, संत्रानगरी धोक्याच्या उंबरठ्यावर; प्रदूषणाचा विळखा

Auqib Nabi: जम्मू-काश्मिरच्या गोलंदाजाने इतिहास रचला, रणजी स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी; गौतम गंभीर लक्ष आहे ना तुझं?

तोळ्यात नाही तर किलोत ! विजय-रश्मिकाच्या लग्नासाठी बनवले गेले एवढ्या वजनाचे सोन्याचे दागिने

Latest Marathi News Live Update : जळगावमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची आत्महत्या

Walmik Karad: मनोज जरांगेंचं भाकीत खरं ठरणार? वाल्मिकचा मुलगा धनंजय मुंडेंच्या विरोधात बोलणार? फेसबुक पोस्टचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT