Only 64 wedding moments in the new calendar year Nagpur news 
नागपूर

नव्या पंचांग वर्षात केवळ ६४ लग्नमुहूर्त; विवाहासाठी हे तीन दिवस आहेत सर्वोत्तम

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका लग्न समारंभ अर्थात नवदाम्पत्य जीवन सुरू करणाऱ्यांना बसला आहे. मागील वर्षी लग्नाच्या हंगामात लॉकडाउनमुळे लग्न समारंभ लांबले. दरम्यान, यावर्षीसुद्धा तशीच काहीसी परिस्थिती उद्भवली आहे. यावर्षी नव्या पंचाग वर्षात विवाह योग्य केवळ ६४ मुहूर्तच असल्यामुळे चिंता वाढल्या आहेत. नव्या पंचांग वर्षात अर्थात गुढीपाडवा १३ एप्रिल २०२१ ते गुढीपाडवा २ एप्रिल २०२२ पर्यंत शास्त्रानुसार विवाहासाठी केवळ ६४ मुहूर्त येत आहेत.

चातुर्मासात शुभकार्य करणे टाळले जाते. मात्र, आपात्कालीन परिस्थितीत विवाह करणे आवश्यक असल्यास चातुर्मासातही दिवस, तिथी व नक्षत्रांच्या दृष्टीने १८ मुहूर्त निघत आहेत. शिवाय गुरू व शुक्राच्या अस्तकाळात एकूण ११ मुहूर्त विवाहासाठी योग्य असल्याचे सांगण्यात येत आहे. गुढीपाडव्यापूर्वी वर्तमान पंचांगातील केवळ चारच मुहूर्त विवाहासाठी योग्य राहिलेले आहेत. ३० मार्च आणि १ व ५ एप्रिल २०२१ रोजी विवाहासाठीचे सर्वोत्तम दिवस सांगण्यात येत आहे.

मुहूर्तसिंधू या प्राचीन ग्रंथात गुरू किंवा शुक्र दोघांपैकी एकाचा अस्त व एकाचा उदय काल असताना संकटकाळी मंगलकार्य करण्यास दोष नाही. या वचनानुसार तसेच धर्मशास्त्र विचार मंडळाच्या कालसुसंगत व आचारधर्म या ग्रंथातील विचारानुसार दिलेले हे आपत्कालीन व अडीअडचणीचे मुहूर्त आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

असे आहेत मुहूर्त

महिना तारीख
एप्रिल २४, २५, २६, २८, २९, ३०
मे १, २, ३, ४, ५, ८, १३, २०, २१, २२, २८, ३०, ३१
जून ४, ६, १६, १९, २०, २६, २८
जुलै १, २, ३, १३, १५
नोव्हेंबर २०, २१, २९, ३०
डिसेंबर ७, ८, ९, १३, १९, २४, २६, २७, २८, २९, ३१
जानेवारी २०, २२, २३, २४, २६, २७, २९
फेब्रुवारी ५, ६, ७, १०, १६, १७ 
मार्च २३, २५, २६, २८, २९

चातुमार्सातील आपात्कालीन मुहूर्तांमध्ये

महिना तारीख
ऑगस्ट १०, ११, १४, १८, २०, २१, २६, २७
सप्टेंबर १६
ऑक्टोबर ८, १०, ११, १२, १८, १९, २०, २१, २४

गुरू-शुक्र अस्तकाळातील अडीअडचणीचे मुहूर्त

महिना तारीख
फेब्रुवारी २०२२ २०, २१, २२, २३, २४, २५
मार्च २०२२ ४, ५, ९, १०, २०

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT