The only expectation is that no one else will win Nagpur murder side story 
नागपूर

उपराजधानीतील दहशतीचा अंत; आणखी कुणी ‘विजय’ तयार होऊ नये हीच अपेक्षा!

अनिल कांबळे

नागपूर : विजय वाघदरे हे नाव उच्चारले तरी नारायण पेठेतील नागरिकांची गाळण उडायची एवढी त्याची दहशत होती. सात-आठ वर्षांपासून या गुंडाने वस्तीला वेठीस धरले होते. परंतु, या दहशतीचा रविवारी (ता. ७) अंत झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आणखी एखादा ‘विजय’ तयार होऊ नये, अशी अपेक्षा नारायण पेठेतील नागरिक व्यक्त करीत आहेत.

चाकूच्या धाकावर वसुली, मारहाण आणि शिवीगाळ करणे हे नागरिकांसाठी नित्याचेच झाले होते. पण ‘नंगे से खुदा डरे’ या उक्तीप्रमाणे विजयविरुध्द तोंड उघडण्‍याची कुणाचीही हिंमत नव्हती. पण कधी ना कधी अत्याचाराचा अंत होतोच. रविवारी सायंकाळी विजय याने नारायणपेठेतील फुलविक्रेता रघटाटे याला मारहाण केली. त्यामुळे परिसरातील नागरिक चांगलेच संतापले.

रात्री ८ वाजताच्या सुमारास विजय हा पलांदुरकर व त्याच्या साथीदारासह नारायणपेठेतील एका किराणा दुकानाजवळ आला आणि शिवीगाळ करायला सुरवात केली. जणू त्याचे शंभर अपराध भरले. रात्रीची वेळ होती. तेथे नागरिकांचा जमाव जमला. पाणी डोक्यावरून जाताच जमावाने गुंडांवर हल्‍ला चढविला. काही जण गुंड विजयवर तुटून पडले.

नागरिकांचा रूद्रावतार पाहून त्याचा साथीदार पलांदूरकर पळाला तर दुसरा लपून बसला. गुंड विजय मात्र तावडीत सापडला. विजयच्या अंगावर चाकूचे वार झाले. दगडही डोक्यात घातले. यात विजय आणि त्याच्या दहशतीचा अंत झाला. विजय वाघदरे संपल्याने शांतीनगरातील दहशतीचा अंत झाल्याच्या प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

पोलिसांच्या निष्कियतेमुळेच कायदा हातात घेतला?

कुख्यात विजयच्या विरुद्ध नागरिक शांतिनगर पोलिस ठाण्यात जमा झाले होते. त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. मात्र, शांतिनगर पोलिसांनी कोणतेही गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी विजयचा दगडाने ठेचून खातमा केल्याचे बोलल्या जाते. पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे उपराजधानीत आणखी एक हत्याकांड घडले. विजय याच्याविरूद्ध दुखापतीसह चारपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.त्याच्याविरुद्ध सतत नागरिकांच्या तक्रारी यायच्या. त्यामुळे त्याच्याविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली होती,अशी माहिती आहे. पण वेळेला महत्त्व दिले नाही तर अशा गंभीर घटना होतात हे पुन्हा सिद्ध झाले आहे. 

शांतीनगराच्या वातावरणात तणाव

हत्याकांडानंतर नारायणपेठेत तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. ज्या ठिकाणी वाघधरेची हत्या करण्यात आली. त्या परिसरातील नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. दबक्या आवाजात नागरिक घटनेची माहिती देत आहेत. विजूची दहशत एवढी होती की अनेक जण या हत्याकांडाबाबत बोलायला सुद्धा तयार नाहीत. 

गॅंगवारची भीती

वाघधरे हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी सुनील ऊर्फ लंगडा हारोडे, सागर करारे, यश ऊर्फ बंटी हारोडे व सुमित डेरे या चौघांना अटक केली आहे. एका महिलेसह अन्य तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सुनील याच्याविरूद्ध हत्येचा गुन्हा दाखल होता. याप्रकरणात तो निर्दोष सुटला. सागर यालाही एका हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो पॅरोलवर बाहेर आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. विजूची वस्तीत मोठी दहशत होती तसेच त्याने टोळी तयार केली होती. विजूच्या हत्याकांडानंतर शांतीनगरात पुन्हा गॅंगवार पेटण्याची चिन्हे आहेत. 

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

या हत्याकांडात चार आरोपींना अटक केली असून अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. घटनेच्या वेळी नारायणपेठेपासून सुमारे ५०० मिटर अंतरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा सुरू होती, हे विशेष. दरम्यान, नागरिकांनीच कायदा हातात घेऊन वाघधरे याची हत्या केल्याने शहर पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळीच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शांतीनगर पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी दंगल नियंत्रण पथकासह दीडशे पेक्षा अधिक पोलिस नारायणपेठेत तैनात करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT