only few percentage corona vaccination in nagpur city
only few percentage corona vaccination in nagpur city 
नागपूर

कोरोना योद्ध्यांची माघार, नागपुरात फक्त ३७.४ टक्केच लसीकरण

केवल जीवनतारे

नागपूर : केंद्र व राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा प्रचंड गाजावाजा केला. १६ जानेवारी लसीकरणाचा मुहूर्त पार पाडला. पहिल्या दिवशी उपराजाधीतील पाच लसीकरण केंद्रांवर ५०० पैकी २७० जणांनी लस घेतली होती, तर लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीकरणाचा टक्का वाढेल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. मात्र, मंगळवार १९ जानेवारीलाही मेडिकल, मेयो, डागा, एम्ससह पाचपावलीतील सुतिकागृह अशा पाच केंद्रावर केवळ १८७ जणांनीच लस घेतली आहे. यावरून उपराजधानीतील कोरोना योद्धे लसीकरणापासून दूर असल्याचे दिसून येते.

नागपुरातील कोरोना नियंत्रणासाठी तसेच उपचारादरम्यान फ्रंटवर असणारे कोरोना योद्धे संभ्रमावस्था असल्यानेच लसीकरणाचा टक्का खाली आला आहे. प्रशासनाकडून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस सुरक्षित असल्याचे सांगतिले जात आहे. तरीही लसीकरणासाठी केंद्रावर कोरोना वॉरिअर्स येत नाहीत. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात ६७.२८ टक्के लसीकरण झाले. 

शहरातील लसीकरण -

  • एम्स - ४७
  • पाचपावली - ३२
  • डागा रुग्णालय-३२
  • मेडिकल- २९
  • मेयो- ४५ 

ग्रामीण भागातील लसीकरण -

  • हिंगणा रुरल हॉस्पिटल-३५
  • कामठी उपजिल्हा रुग्णालय- ५७
  • काटोल ग्रामीण रुग्णालय-६१
  • रामटेक उपजिल्हा रुग्णालय-७३
  • सावनेर रुग्णालय-६८
  • उमरेड ग्रामीण रुग्णालय-९८
  • एनकेपी साळवे हॉस्पिटल-७९ 
     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT