nagpur medical college  canva
नागपूर

भीषण वास्तव! सभोवताली मृतदेहांची गर्दी अन् हाताळणारे फक्त चारच जण

केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) शवविच्छेदनगृहाच्या बाहेर बघितल्यास दुःखच...दुःख दिसते. दुःखाचा महापूर आल्याचे नातेवाइकांच्या चेहऱ्यातून स्पष्ट होते. मात्र, या वातावरणाच्या पलिकडे शवविच्छेदनगृहात एक नजर टाकल्यास शवांच्या गर्दीत चार जण दिसतात. दुःखाच्या महासागरात बुडालेल्या नातेवाइकांना वेळेत मृतदेह मिळावा यासाठी ते वर्षांनुवर्षे काम करीत आहेत. कोरोनाच्या महामारीत शवविच्छेदनगृहातील दर दिवसाला चाळीस ते पन्नास मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यासाठी केवळ चार जण आहेत.

कोरोनाच्या विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतात. मात्र, अशा बिकट स्थितीतही मेडिकल लिगल केसेसमध्ये (वैद्यकीय कायद्याशी संबंधित प्रकरणात) कोरोनाबाधितांच्या शवाची उत्तरीय तपासणी करण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन करण्याचे काम मेडिकलमधील चार जण करीत असतात. चंद्रशेखर, अरविंद, राजेश आणि शेंडे असे चार जण दिसतात. मेयो रुग्णालयातही चारच जण आहेत. त्यांच्या हातात शवविच्छेदनासाठी छिन्नी, हातोडा, इलेक्ट्रॉनिक आरी, स्कॉल पेल, टूथ फोरसेफ, प्लेन फोरसेफ, शव शिवण्यासाठी सुई दोरा असतो. कोरोना काळात बाहेर अंतर पाळण्याचा संदेश दिला जात असताना या चार जणांना कसलेही फिजिकल डिस्टंन्सिंग नाही की, कसलीही भीती नाही? वर्षभरापासून शवविच्छेदनगृहात कोरोनाबाधित शवांच्या गर्दीत एका एका शवाची उकल करण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्यासाठी ही त्यांची नोकरी असली तरी महामारीच्या या काळात ते खरे कोरोना योद्धे आहेत.

हेही वाचा - नागपूरकरांना ना संचारबंदी, ना जमावबंदी, ना कोरोनाची भीती; नागरिक बिनधास्त रस्त्यांवर

सहा तास किट घालून -

दर दिवसाला मेडिकल-मेयोत सुमारे ८० ते ९० कोरोनाबाधितांसह इतर शव असतात. शव विच्छ्देन करण्यासाठी सकाळी ९ वाजता अंगावर पीपीई किट घातल्यानंतर तब्बल सहा ते सात नव्हे तर कधी दहा तास किट काढता येत नाही. अंगातून घामाच्या धारा वाहतात. यांच्या कामाचे कौतुक न्यायवैद्यक विभागातील शवविच्छेदानाच्या कार्यात मदत करणारे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांसह सहाय्यक प्राध्यापक आणि निवासी डॉक्टर सारेच करतात.

हेही वाचा - एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, तरुण मुलापाठोपाठ बापानेही सोडला जीव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT