Only those with "back" paper will get "Carion" 
नागपूर

पेपर बॅक असलेल्यांनाच मिळणार ही सुविधा...

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोनामुळे फक्त अंतिम वर्षातील शेवटच्या सत्रात परीक्षा घेण्यात येत असून पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सत्रातील एखाद्या विषयात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ "कॅरिऑन'चा फायदा मिळणार आहे. भविष्यात परिस्थितीनुसार त्याला बॅक विषय उत्तीर्ण करावाच लागणार आहे. या संदर्भात राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाद्वारे राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा घेण्याबाबत परिपत्रक काढले आहे.

राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात परिपत्रक काढले. यामध्ये पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सत्रातील एखाद्या विषयात अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, त्यांना 50 टक्के आंतरिक गुण आणि 50 टक्के मागील सत्राच्या आधारावर गुणांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय अंतिम वर्षातील शेवटल्या सत्राच्या परीक्षा घेण्याचे ठरविले. या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात आता इतर सत्रात बॅक असलेल्या विषयामध्ये अनुत्तीर्ण असलेल्या विषयांची परीक्षा देण्याची गरज नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

तसा समज पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये पसरत आहे. मात्र, उच्च शिक्षण विभागाकडून काढलेल्या परिपत्रकात असे कुठेच पेपर द्यावे लागणार नाही, असे सांगण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे 50 टक्के आंतरिक गुण आणि 50 टक्के मागील सत्राच्या आधारावर गुणांकन केल्यास मागील सत्रात एखाद्या विषयात अनुत्तीर्ण असलेला विद्यार्थी या गुणांकनानुसार पुढल्या सत्रातही अनुत्तीर्णच राहणार आहे. त्यामुळे या विषयासह जुन्या विषयाची परीक्षा देणे त्याला अनिवार्य आहे. या परिपत्रकानुसार केवळ त्याला पुढच्या सत्रात प्रवेश मिळणार आहे.

गुणवत्तेवर परिणाम नाही


राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार अशा प्रकारे गुणांकन केल्यास गुणवत्तेवर परिणाम होईल, असा गैरसमज पसरविण्यात येत आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे 50 टक्के आंतरिक गुण आणि 50 टक्के मागील सत्राच्या आधारावर गुणांकन होणार आहे. त्या विद्यार्थ्याला परीक्षेशिवाय पर्याय नाही. जुन्या सत्रातील पेपर काढण्यासाठी त्याला त्या सत्रातील परीक्षा देणे गरजेचे आहे. त्या आधारावरच त्याला पदवी मिळणार आहे. विशेष म्हणजे, हे गुण आल्यानंतरच त्याला अंतिम निकाल देण्यात येईल.

जुन्या विषयांची परीक्षा द्यावीच लागणार
जुन्या विषयाचा पेपर द्यावा लागणार नाही, असे कुठल्याही आदेशात नाही. या आदेशाने कृषी विद्यापीठांमध्ये एकेकाळी असलेल्या कॅरिऑन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांना जुन्या विषयांची परीक्षा द्यावीच लागणार आहे.
डॉ. नितीन कोंगरे, व्यवस्थापन परिषद सदस्य.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT