Pandit jasraj had close family relation with Wazalwar family  
नागपूर

लेक व्ह्यू लॉज, ताजबागला न चुकता हजेरी,  नागपुरातील या कुटुंबीयांशी होते पंडित जसराज यांचे ऋणानुबंध

किशोर जामकर

नागपूर : संगीतमार्तंड पंडित जसराज यांचे नागपुरातील प्रसिद्ध लेक व्ह्यू लॉज आणि वझलवार कुटुंबीयांशी ६० च्या दशकात जुळलेले ऋणानुबंध उत्तरोत्तर वृद्धींगत होत गेले आणि मग पंडितजी वझलवार कुटुंबाचे सदस्यच झाले. नागपुरात आले की ‘जय हो‘ म्हणत त्यांची स्वारी लेक व्ह्यू लॉजमध्ये दाखल व्हायची आणि मग दोन-तीन दिवस हा सारा परिसर भारलेला राहायचा. पुढे याच कुटुंबातील गिरीश वझलवार हे त्यांचे पट्टशिष्य बनले आणि हे कौटुंबिक नाते अधिक गहिरे झाले.

नागपुरात बाबासाहेब उत्तरवार यांनी स्थापन केलेल्या ‘स्वरसाधना‘ या संस्थेतर्फे आयोजित मैफलीसाठी पंडितजी १९६४ मध्ये नागपुरात आले होते. तेव्हा गाण्याच्या मैफलींचे आयोजन करणारी ही एकमेव संस्था होती. अण्णाजी वझलवार हे या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. अण्णाजींनी त्यांना लेक व्ह्यू लॉजमध्ये आणले आणि तेव्हापासून पंडितजी नागपुरात आले की त्यांचे वास्तव्य येथेच असायचे. 

लेक व्ह्यू लॉजमध्ये हीराबाई बडोदेकर, वसंतराव देशपांडे, शंकर-शंभू कव्वाल यांच्यासारखे मातब्बर कलावंत वास्तव्यास असायचे. त्यात पंडितजींची भर पडली. लॉजमध्ये दुसऱ्या मजल्यावर गायक-वादकांसाठी एक वेगळी खोलीच तयार करण्यात आली होती. तेथे रियाज चालायचा. पंडितजींचे वास्तव्य लॉजमध्ये असले तरी वझलवार यांच्या घरी जेवायला यायचे. तिखट नसलेले साधे जेवण पंडितजींना आवडायचे. दुधाचे पदार्थ त्यांना विशेष आवडायचे, असे महेश वझलवार यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

पंडितजींचे पट्टशिष्य गिरीश वझलवार यांचे बंधू महेश वझलवार व काही सहकाऱ्यांनी अंदाजे ३० वर्षांपूर्वी ‘नादब्रम्ह' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्‍घाटन पंडितजींच्या हस्ते सीताबर्डीवरील मातृ सेवा संघाच्या सभागृहात झाले होते. काही घरगुती मैफलींमध्ये महेश वझलवार यांनी त्यांना तबल्यावर साथ दिली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विद्युत विभागात असलेले महेश हे मुंबईला राजभवन येथे वास्तव्यास असताना तेथेही पंडितजी यायचे. 

तसेच गिरीश वझलवार यांच्या भगिनी नंदिनी बल्लाळ यांच्याशी पंडितजींचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते. मुंबईत बल्लाळ यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवात पंडितजी गायला यायचे. त्यांचे आमच्या कुटुंबाशी असलेले संबंध ही आमच्यासाठी देवाने दिलेली मौल्यवान भेट होती. ते केवळ शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील गुरू नव्हते तर जीवन शिक्षण देणारेही गुरू होते, अशा शब्दात दामोदर बल्लाळ यांनी पंडितजींना श्रद्धांजली अर्पण केली.

ताजबागला नियमित जायचे


पंडितजी नागपुरात आले की मोठा ताजबाग येथे न चुकता हजेरी लावायचेच. एक-दोनदा त्यांच्यासोबत पंचवटी वृद्धाश्रमात गेल्याची आठवण महेश वझलवार यांनी सांगितली. पंडितजींना क्रिकेटची फार आवड होती. मुंबईत शिवाजी पार्कजवळच्या राजकमल इमारतीत ते राहायचे त्या घराला छोटी गच्ची होती. तेथे ते चंद्रशेखर स्वामी, गिरीश वझलवार, परेश नायक या शिष्यांसोबत टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचे, अशीही आठवण त्यांनी सांगितली. असून, पिकांचीही स्थिती समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा बंपर पीक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण आहेत जॉर्ज कुरियन? केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा का दिला? कारण आलं समोर

Power Supply Restoration: शेतकऱ्यांना दिलासा! उपसा सिंचन बंदी २६ जूनपर्यंत शिथिल; महावितरणला वीज कनेक्शन तत्काळ चालू करण्याचे निर्देश

'त्यांना चांगलाच अनुभव आहे' Lock Up सुरु होण्याआधीच राडा! सलमान-संजय दत्त बद्दल प्रश्न विचारताच भडकला रितेश, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : विजेचा तडाखा; आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर येथील २५० वर्षे जुने चिंचेचे झाड खाक

Pune Businessman Office Firing : पुण्यात व्यावसायिकाच्या कार्यालयावर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने जबाबदारी स्विकारली, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT