file photo 
नागपूर

ट्रान्झिट सेंटरमधून पाच खवले मांजर निसर्गमुक्त 

राजेश रामपूरकर

नागपूर : चीन आणि व्हिएतनाममध्ये या खवले मांजराला मोठी मागणी आहे. मागणीला पुरवठा करण्यासाठी अगदी भारतातूनही या मांजराच्या तस्करीची प्रकरणे पुढे आली आहेत. त्यामुळे वन विभागाने तस्करांवर करडी नजर ठेवली असून, तस्करांना ताब्यात घेण्यात येत आहे. नागपूर शहरात तस्करांच्या ताब्यातील दोन आणि बचाव पथकाने पकडलेले तीन अशा पाच खवले मांजरांना ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या चमूने यशस्वीपणे निसर्गमुक्त केले आहे.

शहराजवळच सर्पमित्रांनी रेस्क्यू केलेल्या खवले मांजराला वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन त्याच्या अधिवासात निसर्गमुक्त करण्यात आले आहे. खवले मांजराची शिकार आणि त्याच्या खवल्यांची तस्करीचे प्रमाण खूप वाढले आहे. आंतरराज्यीय टोळ्या खूप सक्रिय झालेल्या आहेत.  खवले मांजर पकडणे, त्याला मारणे आणि त्याचे खवले विकणे हा गोरखधंदा सुरू आहे. वनविभागाच्या चमू सक्रिय आहेत. त्यामुळेच तस्कर पकडले जात आहेत. संबंधितांना शिक्षा पण होत आहे. वन्यजीवांची शिकार किंवा तस्करीचे प्रकार निदर्शनात आल्यास ०७१२-२५१५३०६ किंवा ९८२२७३७८०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

कोरोना विषाणूचा उगम नेमका कोणत्या प्राण्यातून झाला, याबाबत संशोधन सुरू आहेत. वटवाघूळ खाल्ल्याने विषाणूचा प्रसार झाला, अशी सुरुवातीला चर्चा होती. पण नेमका प्राणी कोणता, याचा ठोस पुरावा अजूनही सापडला नाही. मात्र, हा प्राणी खवले मांजर होता, असेही बोलले जात आहे. चीनमध्ये खवले माजरांच्या खवल्याचा आणि रक्ताचा वापर औषधांमध्ये करण्यात येतो. या औषधांनी असाध्य रोग बरे होतात, अशी धारणा चीनमधील नागरिकांची आहे. तसेच त्याच्या कातडीपासून जॅकेटही तयार केले जातात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खवले मांजराला अधिक मागणी आहे.  
   
संपादन : मेघराज मेश्राम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT