Kondhali School News Sakal
नागपूर

Kondhali School News : जंगलातून दुसऱ्या शाळेत कसे जायचे ?

पालकांचा सवाल ः शाळा बंद न करण्यासाठी निवेदन सादर

सकाळ वृत्तसेवा

कोंढाळी : गावातील शाळा बंद केल्यास जंगलातून दुसऱ्या गावातील शाळेत विद्यार्थ्यांना जावे लागेल. त्यामुळे कुठल्याही स्थितीत गावातील शाळा बंद करू नका या मागणीसाठी काटोल तालुक्यातील किनकीघोडा या आदिवासीबहुल गावातील विद्यार्थी व पालकांनी काटोल पंचायत समितीचे सभापती सभापती संजय डांगोरे यांना निवेदन सादर केले.

काटोल पंचायत समिती अंतर्गत १३८ शाळा असून, दहापेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा १५ आहेत. किनकघोडा हे गाव त्यापैकीच एक आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळेना समूहशाळेकरिता प्रस्तावित करण्याचा घाट असल्याची चर्चा गावागावांमध्ये आहे.

असे झाल्यास कमी लोकसंख्या असेल्या किनकीघोडा गावातील दहा विद्यार्थ्यांना जंगलातून मार्ग काढत दुसऱ्या गावातील शाळेत जावे लागेल. यात विद्यार्थ्यांच्या जीवितासही धोका होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकानी पंचायत समिती गाठून आपली शाळा बंद करू नये यासाठी सभापती डांगोरे यांना निवेदन दिले.

निवेदनानुसार सदर शाळा समूहशाळेकरिता प्रस्तावित केली तर शाळा बंद होईल आणि मुले शिक्षणापासून वंचित राहतील अशिक्षित राहील. शिक्षण हा मुलांचा मूलभूत हक्क आहे. शाळा बंद झाल्यास किनकिघोडा सारख्या आदिवासी आणि जंगलामध्ये असलेल्या गावातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावात जावे लागणार आहे.

एक किलोमीटरच्या आत मुलांना शिक्षण द्यायचे असेल तर समूहशाळा कशा उदयास येतील हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळे किनकीघोडा सारख्या शाळा समूहशाळेकरिता प्रस्तावित करू नये अशी मागणी पालकांनी निवेदनातूनस केला.

यावेळी पंचायत समिती सभापती संजय डांगोरे यांच्या समवेत गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर हेही उपस्थित होते. निवेदन देताना शिष्टमंडळात गावातील शाळा समितीच्या पदाधीकारी जोत्सना वाघदरे, वर्षा कोवळे, सावित्री सलाम, यांच्यासह डिंपल वाघधरे, अवंती सहारे, सिमरन शेंद्रे, वैशाली कोहळे, दर्पण वाघदरे, उत्कर्ष कोहळे हे विद्यार्थीही उपस्थित होते.

आदिवासीबहुल गावातील विद्यार्थ्यांचे नुकसान

काटोल तालुक्यात शिक्षकांच्या ७५ जागा रिक्त असून त्याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. परंतु समूहशाळेची निर्मिती करून सरकार काय साध्य करणार हा प्रश्न पालक उपस्थित करीत आहे. यामुळे गरीब आणि आदिवासीबहुल गावातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

तेव्हा समूह शाळा करताना या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी सरकारने घेण्याची गरजेही पालक व्यक्त करीत आहे. सभापती संजय डांगोरे यांनी काटोल तालुक्यामध्ये कुठलीही शाळ बंद करण्यात येणार नाही. त्यासाठी शासनाच्या या निर्णयाचा विरोध करू ,असे मुलांना आश्वस्त केले. समूह शाळेकरिता कुठल्याच शाळा बंद करू नये आणि शिक्षकांची रिक्त पदे त्वरित भरण्याचा ठराव सुद्धा पंचायत समिती काटोलच्या सभेत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT