airplane 
नागपूर

भाड्याचे पैसे देण्यास नकार, विमान कंपन्यांविरुद्ध नागपूरचे प्रवासी दिल्ली दरबारी!

योगेश बरवड

नागपूर : नागपूरचे हरिहर पांडे यांनी लॉकडाऊनपूर्वी 30 जुलैच्या नागपूर ते मुंबई प्रवासासाठी गो एअरची 50 गृप तिकीटे बुक केली होती. त्यासाठी गो एअर विमान कंपनीकडे 1 लाख 34 हजार 750 रुपये जमा केले आहेत. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे विमान रद्द झाले. कंपनीने तिकिटाची रक्कम क्रेडीट सेलमध्ये ठेवून घेतली.

पुढच्या वेळी तिकीट घेताना रक्कम वापरता येईल, असे ग्राहकांना कळविण्यात आले. पण, पुढील तारखेच्या तिकिटासाठी फारच अधिक शुल्क भरण्यास सांगण्यात आले.
या अन्यायाविरुद्ध पांडे यांनी दंड थोपटले. गो एअरला वारंवार विनंती करून रिफंड, क्रेडीट सेल संदर्भात विचारणा केली. पण, कंपनीने कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. यावरून गो-एअर स्वतःचे नियम प्रवाशांवर थोपवत असल्याचे स्पष्ट झाले.

कोरोना काळात रद्द झालेल्या विमानांचे भाडे परत देण्यास विमान कंपन्या टाळाटाळ करीत आहेत. "क्रेडीट सेल'च्या नावाखाली प्रवाशांची आर्थिक कोंडी करण्याविरोधात नागपूरच्या 50 प्रवाशांनी लढा उभारला आहे. "लोक शिकायत'चा आधार घेत हे प्रकरण थेट दिल्ली दरबारी मांडण्यात आले आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, विमान मंत्रालयासह 11 विभागांनी या प्रकरणाची दखल घेत नागरी विमानवाहतूक महासंचलनालयाला पत्र पाठवून पुढील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

विमानप्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यम-गरीब परिस्थिती असलेल्या 50 प्रवाशांचे पैसे परत न करता, नविन बुकिंगची सक्ती करून चारपट जास्त तिकीट आकारून फसवणूक करीत आहे. "क्रेडीट सेल'च्या नावावर 1 लाख 34 हजार 750 रुपये जमा ठेवणे, भविष्यात गरज नसताना ग्राहकांवर विमानप्रवास थोपविणे, रद्द होत असलेल्या तिकीटांचे पैसे प्रवाशांच्या इच्छेविरुद्ध वापरणे, हा प्रकार गो-एअरकडून सुरू असून 50 प्रवाशांसह त्यांचेशी संबंधित शेकडो नातेवाईकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास होत असल्याचे केंद्रीय विभागांच्या निदर्शनास आणून दिले.

सविस्तर वाचा - अबब! या अभेद्य इमारतीचे वय 106 वर्षे?

विमान तिकिटासंदर्भातील समस्या त्वरीत सोडविण्यासाठी शासनाने "गो-एअर' व्यवस्थापनाला योग्य निर्देश द्यावेत, अशी मागणी हरिहर पांडे यांनी दिल्लीतील प्रशासकीय पत्रव्यवहारात केली. या विभागांनी प्रकरणाची दखल घेत नागरी विमानवाहतूक महासंचलनालयाला पत्र पाठवून पुढील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

Sharad Pawar: दुष्काळाचे दुखणे कमी करण्याचा प्रयत्न: शरद पवार : बारामतीतील जिरायती भागात शेतकऱ्यांशी संवाद

Satara Leopard Attack: वीजपुरवठा खंडित झाला अन् बिबट्याने साधला डाव; न्हाळेवाडीत २६ महिन्यांच्या चिमुकल्याचा करुण अंत, आईने फाेडला हंबरडा

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

SCROLL FOR NEXT