The passenger's wallet he was killed by, the police smiled
The passenger's wallet he was killed by, the police smiled 
नागपूर

तो मारायचा प्रवाशांचे पाकिट, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्‍या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: प्रवाशांचे पाकीट मारत फिरणाऱ्या चोरट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या जावानांनी वेळीच अटक केली. त्याच्याकडून चोरीचे एक पाकीटही जप्त करण्यात आले असून, त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली. बुधवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर ही कारवाई करण्यात आली.

रहमान ऊर्फ अनीश खान (18) असे चोरट्याचे नाव आहे. तो मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहे. आरपीएफच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातील जवान भूपेंद्र बाथरी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून होते. पूर्व प्रवेशद्वाराकडील एका कॅमेऱ्यात रहमान संशयास्पद अवस्थेत फिरत असल्याचे त्यांना दिसले. पाहता क्षणीच त्यांना शंका आली. त्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेवरूनच त्याच्यावर पाळत ठेवली होती. दुपारी 12.30 वाजता फलाटावरील शशिकांत गजभिये, अनिल उसेंडी, शेख शकील, जसवीर या सहकाऱ्यांना सूचना दिली. चोरटा थोड्याच वेळात रेल्वे आरक्षण केंद्रात गेला. दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका प्रवाशाच्या खिशात हात टाकताच पाळत ठेवणाऱ्या जवानांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. यानंतर ठाण्यात आणून उपनिरीक्षक जी. एस. एडले यांच्यासमोर हजर करण्यात आले. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे चोरीचे पाकीट आढळले. त्यात रोख रक्कम आणि आधार कार्डची झेरॉक्‍स आढळून आली. आधार कार्डवर सुनील तंगडपल्लीवर नावाचा उल्लेख आहे. याबाबत विचारणा केली असता चोरट्याने हे पाकीट प्रवाशाच्या खिशातून चोरल्याची कबुली दिली. त्याआधारे चोरीचे पाकीट आणि चोरट्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चोरट्याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT