कुही : तहसील कार्यालयात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी ठाकरे. 
नागपूर

आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेले ते रूग्ण विविध आजाराने, नुसते कोरोनाने नव्हे...

दिलीप चव्हाण

मांढळ (जि.नागपूर): आतापर्यंत 37 लोक मरण पावले. मात्र, ते नुसत्या कोरोनामुळे नव्हे, तर कुणाला क्षयरोग, हृदयरोग, शुगर, बीपी किंवा इतर गंभीर आजार होते, असे लक्षात आले. मात्र, काहींनी अतिशय दुर्लक्ष केले. त्यामुळे तशी वेळ आली, म्हणून प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कुही येथील आढावा सभेत दिला.

क्‍वारंटाइनला घाबरू नका !
कोविडला व क्वारंटाइनला घाबरू नका. मात्र, प्रत्येकाने मास्क वापरा, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पालन करा, तरच आपण ही लढाई जिंकू शकतो. ग्रामपंचायत, नगरपंचायत, तहसीलदार कार्यालयाने मास्क न वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, यात कुणाचीही गय करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे कुही तालुक्‍यातील प्रशासकीय अधिका-यांना दिले.

अधिक वाचा : "हे' गवत आहे भयंकर विषारी, मात्र मोवाडवासींची ठरली डोकेदुखी...

... तर लॉकडाउनची वेळच येणार नाही !
आता शेतकरीबांधव शेतीच्या कामात आहेत. अशावेळी लॉकडाऊन करणे शक्‍य नाही. परंतु, नियमांचे काटेकोरपणे पालन केले, तर लॉकडाउनची वेळच येणार नाही. आज कुही तालुक्‍यातील लोकप्रतिनिधी, तहसीलदार, बीडीओ, डॉक्‍टर्स, कृषी, शिक्षण, आरोग्य, महसूल, नगरपंचायतचे अधिकारी व पत्रकार, अंगणवाडीसेविका, आशावर्कर यांना कोविड विरुद्ध लढाईतील अनुभव कथन करताना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

अधिक वाचा :  "त्याला' बुडताना पाहून मित्र गेले पळून, नंतर सायंकाळी घडले असे...

आशावर्करची विशेष मानधनाची मागणी
आशावर्कर यांना कोविड विरुद्ध लढाईतील आरोग्य विभागाने दिलेल्या प्रत्येक कामात अग्रेसर असणारा महत्त्वाचा घटक मानला जातो. आम्ही आमच्यासाठी व देशासाठी हे काम करत आहोत. पण, यासाठी आम्हाला काहीतरी मानधन मिळाले, तर बरे होईल, अशी अपेक्षा आशावर्कर यांनी व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकारी म्हणाले की, पालकमंत्री यांच्याकडे आपली मागणी ठेवतो ते शासनापर्यत पोचवतील.महाबीजच्या आतापर्यंत तक्रारी आल्या असून, त्या तत्काळ निकाली काढण्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी आदेश दिले.

संपादन : विजयकुमार राऊत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT