Pench National Park sakal
नागपूर

Pench National Park : पेंचमध्ये होणार पाणमांजर ‘संवर्धन प्रजनन प्रकल्प’

राज्यात लवकरच विविध दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींसाठी ''संवर्धन प्रजनन प्रकल्प'' सुरू करण्यात येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्यात लवकरच विविध दुर्लक्षित वन्यजीव प्रजातींसाठी ''संवर्धन प्रजनन प्रकल्प'' सुरू करण्यात येणार आहेत . पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणमांजरांचे प्रजनन केले जाणार आहे. या संवर्धन प्रजनन प्रकल्पांसाठी वन विभाग आणि ''बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी''मध्ये (बीएनएचएस) सामंजस्य करार होणार आहे. ‘सकाळ''ने यासंदर्भात सर्वप्रथम वृत्त प्रकाशित केले होते.

राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीची दुसरी बैठक मुंबईत झाली. या बैठकीत जल जीवन मिशन प्रकल्पासाठी संरक्षित वन क्षेत्रांमधील निवडलेल्या गावांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे या गावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. स्थायी समितीच्या पहिल्या बैठकीत राज्यातील विविध संकटग्रस्त प्रजातींसाठी राबविण्यात येणाऱ्या ''संवर्धन प्रजनन प्रकल्पा''संदर्भात चर्चा झाली होती.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संवर्धन प्रजनन प्रकल्पांसाठी ''बीएनएचएस''सोबत लवकरात लवकर सामंजस्य करार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. ''बीएनएचएस'' आणि वन विभागाच्या माध्यमातून येत्या काळात राज्यात तणमोर, माळढोक, गिधाड, पाणमांजर, रानम्हशी, सारस आणि लाजवंती (स्लेंडर लॉरिस) या दुर्लक्षित वन्यजीव प्रजाचींचे संवर्धन प्रजनन प्रकल्प केले जाणार आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये पिंजराबंद अधिवासात शास्त्रीय पद्धतीने संकटग्रस्त प्रजातींचे प्रजनन केले जाते. जेणेकरून संकटग्रस्त प्रजातींची संख्या स्थिर राहण्यास मदत मिळेल.

''बीएनएचएस''कडून पेंच व्याघ्र प्रकल्पात पाणमांजरांसाठी संवर्धन प्रजनन प्रकल्प संचालित करण्यात येणार आहे. यासाठीचा पत्रव्यवहार सध्या सुरू असून या प्रकल्पाला लवकरच अंतिम स्वरुप प्राप्त होईल. पेंच व्याघ्र प्रकल्पात स्मूथ कोटेड आणि युरेशियन प्रजातीचे पाणमांजर आढळतात. या प्रजातींचे संवर्धन प्रजनन प्रकल्प राबविण्यासाठी वन विभागाकडून ''बीएनएचएस''सोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे.

यासोबतच गोरेवाड्यामध्ये रानम्हशीचा संवर्धन प्रजनन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी गडचिरोली आणि आसाम येथून रानम्हशींना स्थानांतरित करण्यासंदर्भातील विचार सुरू आहे. सारस पक्ष्यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण करण्यासंदर्भातही ''बीएनएचएस''ची वन विभागासोबत चर्चा सुरू आहे. यामध्ये सर्वप्रथम सारस पक्ष्यांचे प्रजनन करुन त्यानंतर त्यांचे चंद्रपूरात स्थानांतरण केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT