Pench project Now Agro forest tourism 
नागपूर

नागपूर : पेंच प्रकल्पात आता कृषी-वन पर्यटन

मचानावर बसून घ्या आकाश दर्शनाचा आनंद

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावातील आदिवासी संस्कृतीची ओळख व्हावी, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने कोलितमारा येथे कृषी- वन पर्यटन सुरू करण्यात येत आहे. यामध्ये बैलगाडी चालवणे, म्हशीची सवारी आणि शेतीच्या कामात सहभागी होता येणार आहे. याशिवाय पर्यटकांना समृद्ध आदिवासींचे दैनंदिन जीवन, सण-उत्सव इत्यादींची ओळख करून दिली जाणार आहे. गावात पिकवल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या पिकांच्या शेतीचे तंत्रही जाणून घेण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे.

पेंच नदीच्या पश्चिमेकडील नागलवाडी बफर क्षेत्रातंर्गत कोलितमारा गाव आहे. हे पेंच व्याघ्र प्रकल्पातील सात सफारी पर्यटक प्रवेशद्वारापैकी एक आहे. येथेच सर्वात जुन्या वन विश्रामगृहही आहे. हा परिसर निसर्गप्रेमी आणि पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन आहे. आदिवासीबहुल असल्याने आदिवासींच्या जीवनाचे अनोखे दर्शन या गावात घडते.

पर्यटकांना यासाठी स्थानिक गाईड घ्यावा लागणार आहे. कोलितमारा ग्रामविकास समिती आणि आनंदीबाई बचतगट यांच्यामार्फत पेंच व्याघ्र प्रकल्पाचा हा संयुक्त प्रकल्प आहे. कोलितमाराच्या पर्यटन संकुलातही राहण्याची सोय आहे. पर्यटक सफारीही बुक करू शकतात. मोठ्या गटांना कॅंटर उपलब्ध करून दिला जाणार आहे. सुविधेसाठी फक्त mahaecotourism.gov.in द्वारे ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे.

यात सुमारे ५० लोकांना थेट रोजगार देण्याची योजना आहे, असे प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल यांनी कळविले आहे.

रात्रीच्या मुक्कामाची सोय उपलब्ध

निसर्गरम्य जंगलाच्या पार्श्वभूमीवर पेंच नदीत बोटिंगचा आनंद घेऊ शकणार आहे. समृद्ध पक्षी विविधतेमुळे, पर्यटकांना या भागातील समृद्ध जैवविविधतेचा वारसा न्याहाळता येणार आहे. गावातील शेतात उभारलेल्या मचानांवरुन तारे पाहणे आणि रात्रीचा मुक्कामही करता येणार आहे. दरम्यान, आदिवासी समुदायाशी संवाद, ग्रामीण खेळ, सूर्यास्त आणि सूर्योदयाचे दृश्यही पाहता येणार आहे. स्थानिक खाद्यपदार्थांसाठी शेतात लावलेल्या भाज्यांचा आस्वादही घेता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: पेट्रोल-डिझेलनंतर LPG दर वाढणार का? देशात इंधनाचा किती साठा शिल्लक? सरकारने संपूर्ण आकडाच सांगितला

Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गाचा आराखडा पुन्हा बदलला, लांबी थेट 856 किमी! आता तुमच्या जिल्ह्यातून जाणार का? पाहा नवीन नकाशानुसार यादी

Kalyan: क्रूरतेची सीमा गाठली! भटक्या कुत्र्यांना मारून नाल्यात फेकलं, केडीएमसीच्या कंत्राटदाराचं कृत्य

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद

महाराष्ट्र सोडण्याच्या विचारात आहेत नाना पाटेकर? भर सभेत मंत्र्यांसमोर केलं विधान, म्हणाले, 'खेड्यातली माणसं...'

SCROLL FOR NEXT