Elephant sakal
नागपूर

Pench Tiger Project : पेंचमधील कॅम्पमध्ये लवकरच तिसरा हत्ती येणार

पेंच व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॅम्पमध्ये चार हत्ती आणले जाणार होते. त्यातील पहिल्या टप्प्यात कर्नाटकातून दोन गजराज कॅम्पमध्ये दाखल झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॅम्पमध्ये चार हत्ती आणले जाणार होते. त्यातील पहिल्या टप्प्यात कर्नाटकातून दोन गजराज कॅम्पमध्ये दाखल झाले आहे. गडचिरोलीतील पदमापूर कॅम्पमधून एका मादी हत्ती आणण्यासाठी चमू गेली होती. मात्र, विरोध केल्याने अधिकाऱ्यांना रिकामेच परतावे लागले.

दरम्यान, कर्नाटकात सत्ता बदल झाल्यानंतर तेथील सरकारने हत्ती देण्यास नकार दिला होता. आता मात्र, कर्नाटकच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी हत्ती देण्याबाबत सकारात्मकता दाखविल्याची माहिती पुढे आली आहे.

पेंच व्याघ्र प्रकल्पातील हत्ती कॅम्पमध्ये दोन हत्ती दाखल झालेले आहेत. लवकरच तिसरा हत्ती कर्नाटकातून आणण्याचे प्रयत्न केले जात आहे. तेथील सरकारसोबत बोलणे झाले असून कर्नाटकच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनीही हत्ती देण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे.

- महिप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

जंगलात नियमित गस्त घालणे, दुर्गम भागातील बचाव कार्य तसेच इको टुरिझमच्या उद्देशाने महाराष्ट्राच्या पेंच व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने चार हत्ती आणण्यात येणार होते. त्यातील दोन हत्ती दाखल झाले आहेत. मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्याच्या चोरबाहुली रेंजमध्ये असणाऱ्या हत्ती कॅम्पमध्ये त्यांना ठेवण्यात आलेले आहे. मादी हत्ती आणि एक हत्ती तातडीने आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

- डॉ. प्रभू नाथ शुक्ल, क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प

असा आहे हत्ती कॅम्प

बोरबन वनक्षेत्र हत्तींच्या छावणीसाठी उत्तम स्थान आहे. नवेगाव-खैरी धरणातील बॅकवॉटरमध्ये प्रवेश, नैसर्गिक अधिवास, मानवी हस्तक्षेपापासून दूर आणि संरक्षणासाठी एक सुरक्षा झोपडी यासारख्या सुविधा आहेत. हत्तींच्या कॅम्पचे क्षेत्र २ हेक्टरपेक्षा जास्त पसरलेले आहे. तीन नर आणि एक मादी असा चार हत्ती आणण्याची योजना आहे. यापैकी भीमा आणि सुब्रमण्यम हे दोन हत्ती दाखल झालेले आहेत. हे सर्व हत्ती प्रशिक्षित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT